शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या ट्रॅपमध्ये अडकला लाचखोर सचिव

By admin | Updated: April 2, 2015 05:16 IST

विधी व न्याय विभागाचे अवर सचिव मिलिंद कदम यांना ४ लाख रुपयांपैकी ५० हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या

मुंबई : विधी व न्याय विभागाचे अवर सचिव मिलिंद कदम यांना ४ लाख रुपयांपैकी ५० हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार रंगेहाथ पकडले. लाचखोर अधिकाऱ्याला थेट मुख्यमंत्र्यांनीच पकडून दिल्याने मंत्रालयात खळबळ उडाली आहे.विधी व न्याय विभागाचे अवर सचिव कदम यांच्याकडे मुख्यमंत्र्यांना संबंधित विभागचे ब्रिफिंग देण्याची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री कार्यालयात येणे जाणे होते. आर्वी (जि. वर्धा) येथील एका वकिलाची नोटरी म्हणून नियुक्ती अंतिम करण्यात आल्याची माहिती कदम याला मिळाली होती. त्याने त्या वकिलाशी वारंवार संपर्क साधला आणि तुम्हाला नोटरी म्हणून नियुक्त मिळवून देतो, असे सांगितले. त्या वकिलांना मुंबईत बुधवारी बोलावून घेतले. दरम्यान, मुख्यमंत्र्याशी परिचय असलेल्या या वकिलाने कदमबाबत मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली. त्यावर मुख्यमंत्र्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यास सांगितले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याशी चर्चा केली. वकिलाचे कदमशी दुपारी बोलणे झाले आणि सायंकाळी रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार वकील आणि कदम यांची सीएसटी जवळील शिवाला हॉटेलमध्ये भेट झाली. आपल्याकडे सध्या ५० हजार रुपये आहेत. बाकीची रक्कम उद्या देतो, असे वकीलाने सांगितले. कदम हॉटेल बाहेर आला. त्याने चालता चालता वकिलांकडून पैसे घेतले. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. (विशेष प्रतिनिधी)