वालचंदनगर : येथील बाजारतळाशेजारील वॉर्ड क्र. ३ मध्ये पावसाचे साठलेले अस्वच्छ पाणी नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. या परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविणारी विंधनविहीर या पाण्यात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्वरित येथे मुरूम टाकून स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी या सोसायटीतील नागरिक करीत आहेत. वालचंदनगर येथील बाजारतळाशेजारीच असलेल्या वॉर्ड क्र. ३ मध्ये पावसाचे पाणी साठल्याने बाजारतळाला तळ्याचे स्वरूप आले आहे. घाण पाण्यात गेल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. घाण साठलेल्या पाण्याचा वेळेत उपाययोजना केल्यास नागरिकांना होणारा त्रास थांबेल. नागरिकांना पाण्याचा निचरा करण्यात यावा, अशी मागणी सोसायटीतील नागरिक करी आहेत.(वार्ताहर)
सार्वजनिक विंधनविहिरीभोवती अस्वच्छ पाणी
By admin | Updated: July 31, 2016 01:18 IST