शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांना सण उचल मिळणार

By admin | Updated: November 2, 2015 02:46 IST

एसटी महामंडळ तोट्यात असल्याने दिवाळी भेट किंवा सानुग्रह अनुदान मिळणार नाही, असा पवित्रा परिवहनमंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला होता.

मुंबई : एसटी महामंडळ तोट्यात असल्याने दिवाळी भेट किंवा सानुग्रह अनुदान मिळणार नाही, असा पवित्रा परिवहनमंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला होता. यामुळे एसटी कामगारांकडून नाराजी व्यक्त केली जात असतानाच, दहा हजार रुपये सण उचल देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला, तसे परिपत्रकच जारी केले आहे. १ लाख ७ हजार कामगारांना त्याचा फायदा मिळणार आहे. एसटीतील सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना सरसकट १५ हजार किंवा दहा हजार रुपये दिवाळी भेट देण्यात यावी, अशी मागणी सर्व एसटी कामगार संघटनांकडून करण्यात आली होती. सानुग्रह अनुदानास पात्र ठरणारे एसटीत फारच कमी कामगार असून, त्यामुळे सरसकट दिवाळी भेट देण्याच्या या मागणीला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नकार दिला आणि एसटी तोट्यात असल्याचे कारण सांगितले. त्यामुळे कामगार वर्गात नाराजीचा सूर उमटला होता. आता मात्र, एसटी महामंडळाने शासन निर्णय आणि कामगार करारानुसार मूळ वेतन २५,५८१ रुपये अथवा त्यापेक्षा कमी असलेल्या कर्मचारी, कामगारांना दहा हजार रुपये सण उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. सानुग्रह अनुदानाबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. सानुग्रह अनुदान मिळणारे ४४१ कामगार आहेत.कामगार करारात असलेल्या तरतुदीनुसार हे पैसे एसटी कामगारांना मिळणार आहेत. मात्र, सानुग्रह अनुदान किंवा दिवाळी भेट देण्याबाबत एसटीकडून निर्णय झालेला नाही, असे शिवाजीराव चव्हाण (महाराष्ट्र एसटी कामगार संघटना- अध्यक्ष) यांनी सांगितले.