शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांचे मोर्चे मंत्रालयावर धडकणार

By admin | Updated: December 31, 2016 03:03 IST

नवीन वेतन करार अमलात आणावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, १ एप्रिल २0१६ पासून २५ टक्के अंतरिम वाढ लागू करा यासह अन्य मागण्यांसाठी एसटीतील कामगार

मुंबई : नवीन वेतन करार अमलात आणावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, १ एप्रिल २0१६ पासून २५ टक्के अंतरिम वाढ लागू करा यासह अन्य मागण्यांसाठी एसटीतील कामगार संघटनांनी मंत्रालयावरच मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून ३ जानेवारीला हल्ला बोल मोर्चा तर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून २0 जानेवारी रोजी धडक मोर्चा काढला जाणार आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराची मुदत ३१ मार्च २0१६ रोजी संपली आहे. त्यामुळे १ एप्रिल २0१६ पासून नवीन वेतन करार अमलात येणे गरजेचे होते. यात एसटी प्रशासनाकडून पगारवाढीसाठी नेमलेल्या वेतन सुधार समितीला फेब्रुवारी २0१७ पर्यंत मुदतवाढ देऊन टाळाटाळ चालली असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून करण्यात आला. तुटपुंज्या पगारात एसटी कामगारांना आपला संसार चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्वरित पगारवाढ होणे गरजेचे असतानाही त्याकडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. त्वरित पगारवाढ द्या किंवा ३0 टक्के अंतरिम वाढ द्या या प्रमुख मागणीसह अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून ३ जानेवारी २0१७ रोजी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने एसटी व्यवस्थापनाकडे १ एप्रिल २0१६ पासून वाढीव वेतन मिळवण्यासाठी मागण्यांचा मसुदा सादर केलेला आहे. सादर केलेल्या मागणी मसुद्यामध्ये एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करा, जेणेकरून कामगारांना भरीव आर्थिक मदत मिळेल. तसेच एसटी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्यासाठी शासनात विलीन करा, १ एप्रिल २0१६ पासून २५ टक्के अंतरिम वाढ लागू करा, कनिष्ठ वेतनश्रेणी लागू करा, शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व एसटी कामगारांचे वेतन यामधील तफावत दूर करा इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी महामंडळाकडे सादर केल्या आहेत. या मागण्यांची सोडवणूक करण्यास शासनाने टाळाटाळ केल्यास बेमुदत संपासह कोणतेही आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून २0 जानेवारीला मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)मागण्यांसंदर्भात एसटी महामंडळाशी बैठकही घेण्यात आली. मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलन करण्यावर आम्ही ठाम आहोत. - श्रीरंग बरगे, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस-सरचिटणीससातवा वेतन आयोग आणि २५ टक्के अंतरिम वाढ लागू करा या मागणीसह अन्य मागण्या केल्या असून त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. यासाठी धडक मोर्चा काढणार आहोत. तरीही तोडगा निघाला नाही तर बेमुदत संप हाच एक पर्याय राहील. - हनुमंत ताटे, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना-जनरल सेक्रेटरी