शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगार संपावर?

By admin | Updated: December 13, 2015 01:08 IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या २५ टक्के पगारवाढीचा निर्णय येत्या १७ डिसेंबरपर्यंत न घेतल्यास त्याच दिवसापासून एसटी कामगार संपावर जातील, असा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)

ठाणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या २५ टक्के पगारवाढीचा निर्णय येत्या १७ डिसेंबरपर्यंत न घेतल्यास त्याच दिवसापासून एसटी कामगार संपावर जातील, असा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला. या संपात कामगारांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार हे शासकीय व इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यंत कमी आहेत. वाढती महागाई, कौटुंबिक अडचणी, गृहकर्ज, वैद्यकीय खर्च, पाल्यांचे शिक्षण, आदीमुळे ते कर्जबाजारी झाले आहेत. आंध्र-तेलंगणामध्ये तेथील एसटी कर्मचाऱ्यांना ४४ टक्के पगारवाढ दिली आहे. परंतु महाराष्ट्रातीलच एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय का, असा सवालही त्यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही पाचवा, सहावा वेतन आयोग लागू झालेला नाही. त्यातही मान्यताप्राप्त संघटनेने दिलेली आश्वासनेही अद्याप पूर्ण केलेली नाहीत. एसएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढ मिळविण्यासाठी इंटकच्या वतीने वेळोवेळी एसटी प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आगारपातळीपर्यंत व विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले आहे. परंतु, अद्यापही एसटी प्रशासन अथवा शासनाकडून लक्ष दिले गेलेले नाही. २०१२-२०१६ कामगार करार रद्द करून २०१२-२०१६ या कालावधीकरिता २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यासंदर्भात राज्यभरातून ५३ हजार ५०३ कर्मचाऱ्यांनी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना पत्रही दिले आहे. परंतु, अद्यापही त्यावर तोडगा काढण्यात न आल्याने हे संपाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.