शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची विनाअपघात सुरक्षितता मोहीम

By admin | Updated: January 5, 2015 04:46 IST

सुरक्षित प्रवासाविषयी जनजागृती करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे विनाअपघात सुरक्षितता मोहीम राबविली जात आहे.

ठाणे : सुरक्षित प्रवासाविषयी जनजागृती करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे विनाअपघात सुरक्षितता मोहीम राबविली जात आहे. येत्या १० जानेवारीपर्यंत एसटीच्या ठाणे विभागीय कार्यालयातर्फे जिल्ह्यातील आठही आगारांमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे. प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास निर्माण करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट अहे. तसेच कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, सुरक्षित वाहतुकीसाठी आखून दिलेली कार्यपद्धती पाळून अपघात होणार नाही याची दक्षता घेणे, या उद्देशाने दरवर्षी ही मोहीम राबविण्यात येते. महामंडळातर्फे चालकांचे प्रशिक्षण, वैद्यकीय तपासणी अशा विविध योजना राबविल्या जातात. त्याचप्रमाणे अपघातविरहित सेवेला प्रोत्साहन मिळावे म्हणून चालकांना रोख बक्षिसे, पारितोषिके, प्रमाणपत्रे आणि सुरक्षित सेवांचे बिल्ले देऊन सन्मानित केले जाते. चालकांसाठी अत्याधुनिक स्वयंचलित चाचणी मार्ग तयार करण्यात आला असून, त्यावर वाहनचालकांना प्रशिक्षण दिले जात आहे. शून्य अपघात मोहीम ही कायमस्वरूपी राबविण्यात येत असते. परंतु, जनजागृतीच्या कालावधीत या मोहिमेला विशेष महत्त्व देण्यात येते, असे एसटीचे ठाणे विभागीय वाहतूक अधिकारी एस.बी. चौगुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. एखाद्या अपघातानंतर जीवितहानी झाल्यास त्याची किंमत पैशांत मोजता येत नाही. विनाअपघात सेवा देण्यासाठी मद्यपान करणारे तसेच बेदरकारपणे गाडी चालविणारे यांचाही गस्ती पथकांद्वारे शोध सुरू असल्याचेही एसटीच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)