शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

एसटी प्रवाशांना ३० रुपयांत चहा-नाश्ता!

By admin | Updated: October 28, 2016 01:41 IST

एसटी बसच्या अधिकृत खासगी थांब्यांवर आॅगस्ट महिन्यापासून ३० रुपयांत चहा-नाश्ता उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र बहुतांश प्रवासी अद्याप याबाबत अनभिज्ञ

मुंबई : एसटी बसच्या अधिकृत खासगी थांब्यांवर आॅगस्ट महिन्यापासून ३० रुपयांत चहा-नाश्ता उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र बहुतांश प्रवासी अद्याप याबाबत अनभिज्ञ असल्यामुळे आता याची माहितीपत्रके वाहकांमार्फत पोहोचविण्याचे महामंडळाने ठरविले आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे तीन दिवस ही पत्रके प्रवाशांना वाटण्यात येणार आहेत.महामंडळाने उपलब्ध करून दिलेल्या शिरा, पोहे, उपमा, वडापाव, इडली, मेदूवडा यापैकी एक पदार्थ आणि चहा प्रवाशांना घेता येणार आहे. सध्या २२ अधिकृत थांब्यांवर ही सुविधा सुरू करण्यात आली असून लवकरच आणखी १०० थांब्यांवर ती सुरू करण्यावर विचार केला जात असल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली. खासगी अधिकृत थांब्यांवरही अवाजवी दर आकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी महामंडळाकडे येत होत्या. त्याचा अभ्यास करून महामंडळाने अहवाल तयार केला आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ३० रुपयांत दर्जेदार चहा व नाश्ता देण्याच्या सूचना आॅगस्ट महिन्यात अधिकृत थांबा असलेल्या उपाहारगृहांना देण्यात आल्या. तसेच खाद्यपदार्थांचे दरपत्रक प्रवाशांना सुस्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावण्याचेही त्यांना बजावण्यात आले आहे. प्रवाशांना कोणत्याही प्रकारची असुविधा झाल्यास संबंधित उपाहारगृहाचा परवाना रद्द करण्यापर्यंतची कारवाई केली जाणार आहे, तर जादा दर मागितल्यास थांबाही रद्द करण्यात येऊ शकतो, असे महामंडळाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)