शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे एसटी खिळखिळी

By admin | Updated: November 10, 2014 04:22 IST

ठाणे ते नाशिक या दरम्यानच्या महामार्गावर खड्ड्यांचा कहर झाला आहे. टोल कंत्राटदार त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात चालढकल करत आहे

ठाणे : ठाणे ते नाशिक या दरम्यानच्या महामार्गावर खड्ड्यांचा कहर झाला आहे. टोल कंत्राटदार त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात चालढकल करत आहे. त्यामुळे या मार्गावरून रोज धावणाऱ्या जवळपास अडीचशे बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. बस बिघडण्याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. एकीकडे हे संकट आणि दुसरीकडे आवश्यक त्या सुट्या भागांची तातडीने न होणारी खरेदी यामुळे एसटी कचाट्यात सापडली आहे.या महामार्गावर मुलुंड टोलनाका, खारीगाव टोलनाका, पडघा टोलनाका आणि घोटी टोलनाका अशा चार ठिकाणी टोल वसूल होतो. मुंबई व ठाणे शहरांतला महामार्ग उत्तम आहे. परंतु, ठाणे ते नाशिक दरम्यानच्या महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यांची दुरुस्ती आणि बांधणी पेव्हर ब्लॉकने करण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी ९ इंच ते १ फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. त्यांची दुरुस्ती टोल ठेकेदार करीत नाहीत. त्यामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पुरेशा गतीने प्रवासही करता येत नाही. खड्ड्यांमुळे वाहनांचे पाटे आणि अ‍ॅक्सल यांची हानी मोठ्या प्रमाणावर होते आहे. खड्ड्यांमुळे बसणाऱ्या हादऱ्यांमुळे वेगवेगळे सुटे भाग जोडणारे नट आणि बोल्ट सैल होऊन त्यातून वेगळेच दुखणे ओढवते आहे.ठेकेदारांना मोठ्या प्रमाणात टोल मिळतो, तरीही खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रवासी आणि चालक यांना होणारा शारीरिक व मानसिक त्रास वेगळाच आहे. खासगी वाहनांची होणारी झीज आणि ती बंद पडणे, या त्रासातही सध्या प्रचंड भर पडली आहे. शपथविधी आणि मंत्रिपदांचे वाटप यात गुंतलेल्या नव्या सरकारला या महत्त्वाच्या मुद्द्याकडे बघायला वेळ नाही. सतत हादरे बसून प्रवाशांना पाठदुखीचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे एसटीची आणि वाहनचालकांची अवस्था ‘असून नाथ आम्ही अनाथ’ अशी झाली आहे. (विशेष प्रतिनिधी)