शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचा-यांना कामावर तंबाखू खाण्यास मनाई

By admin | Updated: July 30, 2016 21:53 IST

एसटी महामंडळाने बस व बसस्थानके स्वच्छ ठेवण्याचा निर्णय घेतला असून एसटी कर्मचा-यांना कर्तव्यावर असताना तंबाखू खाण्यास मनाई करण्यात आली आहे

हर्षनंदन वाघ / ऑनलाइन लोकमत - 
आता बसस्थानक होणार तंबाखूमुक्त
बुलडाणा, दि. 30 - ग्रामीण भागातील लोकवाहिन्या म्हणून ओळख असणा-या एसटी महामंडळाने बस व बसस्थानके स्वच्छ ठेवण्याचा निर्णय घेतला असून एसटी कर्मचा-यांना कर्तव्यावर असताना तंबाखू खाण्यास मनाई करण्यात आली आहे.
 
तंबाखू खाणा-यामुळे अनेक बसेस, बसस्थानके घाणीने माखलेले दिसून येतात. काही बसस्थानक परिसरात दुर्गंधी सुटल्यामुळे प्रवाशांना थांबणे कठिण असते. त्यामुळे एसटी बसेस, बसस्थानके व आगार परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय शासनाने बुधवारी घेतला आहे. त्या अनुषंगाने आगारातील पानटप-या बंद करून गुटखा, पान, तंबाखू खाणा0याविरूध्द कार्यवाही केली जाणार आहे. तसेच एसटी कर्मचा-यांना कर्तव्यावर असताना तंबाखू खाण्यास मनाई करण्यात आली असून यापुढे तंबाखू खाणाºयास राज्य परिवहन महामंडळात नोकरी द्यायची नाही, असा निर्णयही राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. मात्र बसस्थानक परिसरात असलेल्या पानटप-या बंद करताना या पानटप-यांमध्ये पर्यायी व्यवसायाला परवानगी दिली जाणार आहे.
 
स्वच्छतेसाठी राज्यस्तरावर एकच निविदा बसस्थानके स्वच्छ राहण्यासाठी राज्यस्तरावर एकच निविदा काढली जाणार आहे. एसटी स्थानकाच्या परिसरात असलेली शौचालये, स्वच्छतागृहे प्रवासांसाठी असतात. मात्र त्याचा वापर परिसरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, फेरीवाले करीत असल्याने मोठ्या  प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते. त्यामुळे स्वच्छतागृहे, शौचालये ही कंत्राटी पद्धतीने सुरु केले जाणार आहेत.
 
शासनाच्या परिपत्रकानुसार बसस्थानक परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी करण्यात आली असून  एसटी कर्मचाºयांना तंबाखू खाण्यास मनाई बाबत शासनाचे परिपत्रक व वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करण्यात येईल.
- दीपक साळवे, आगार प्रमुख, बुलडाणा.