शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे कर्मचारी वेतनवाढीपासून वंचित

By admin | Updated: March 10, 2017 02:19 IST

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भात वेतनश्रेणी अभ्यास समितीची स्थापना गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात करण्यात आली. तत्पूर्वी समितीची स्थापना

मुंबई : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भात वेतनश्रेणी अभ्यास समितीची स्थापना गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात करण्यात आली. तत्पूर्वी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याने गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून चार वर्षांसाठी केला जाणारा नवीन वेतन करारही थांबविण्यात आला. परंतु समितीकडून अहवाल सादर करण्यासाठी सातत्याने मागितली जाणारी मुदतवाढ यामुळे ११ महिन्यांपासून वेतनवाढीची प्रतीक्षाच एसटीच्या लाखो कामगारांकडून केली जात आहे. आता वेतन सुधार समितीकडून १५ मार्चपर्यंत अहवाल सादर केला जाणार आहे. यावरून कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, संघटनांकडून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. सुधार समितीची निर्मिती जुलै २0१६मध्ये करण्यात आली. या समितीने देशभर दौरे केले. समितीचा अहवाल नोव्हेंबर २0१६मध्ये येणे अपेक्षित होते. परंतु अहवाल सादर न झाल्याने समितीने फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मागितली. फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करता येऊ शकत नसल्याने अखेर १५ मार्चपर्यंत समितीकडून वेतनवाढ व सुधारणा अहवाल सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी २0१२-१६चा वेतन करार संपल्यानंतर नवीन करार २0१६च्या एप्रिलपासून पुढील चार वर्षांसाठी होणे अपेक्षित होते. परंतु समिती स्थापन केली जाणार असल्याने आणि वेतनात सुधारणा होईल अशी आशा दाखवल्याने वेतन करार करण्यात आला नाही. परंतु ११ महिने उलटूनही वेतनवाढीसंदर्भात निर्णय झालेला नाही. (प्रतिनिधी)सातवा वेतन आयोग नाहीचएसटीच्या कर्मचारी व कामगार संघटनांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी केली आहे. परंतु राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग मिळू शकणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आयोग लागू केल्यास जवळपास १४0 टक्के वेतनवाढ होईल. महामंडळाला ते शक्य नसल्याचेही सांगितले जाते. संपाचा इशाराआम्हाला सातवा वेतन आयोग लागू केला पाहिजे, अशी मागणी आहे. त्यासाठी वेतन सुधारणा समितीकडेही लक्ष आहे. परंतु अद्यापही त्यांचा अहवाल सादर झालेला नाही. अपेक्षेप्रमाणे वेतनवाढ झाली नाही, तर बेमुदत संपावर जाण्याच्या आम्ही तयारीतच आहोत. - संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनाअहवाल सादर करण्यास समितीकडून एवढा उशीर का हेच समजत नाही. आंदोलनाची दिशा ठरवण्यापूर्वी योग्य तो निर्णय महामंडळाने घ्यावा. अन्यथा मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस