शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’ महामंडळ ६६ वर्षांत पहिल्यांदाच ‘मे’मध्ये तोट्यात

By admin | Updated: May 28, 2014 00:55 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाला ६६ वर्षांत पहिल्यांदाच भरघोस उत्पन्न देणार्‍या मे महिन्यात तोटा झाला आहे. मार्च ते मे हे तीन महिने एसटीसाठी उत्पन्नाच्या बाबतीत सुगीचे मानले जातात.

विलास गावंडे - यवतमाळ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाला ६६ वर्षांत पहिल्यांदाच भरघोस उत्पन्न देणार्‍या मे महिन्यात तोटा झाला आहे. मार्च ते मे हे तीन महिने एसटीसाठी उत्पन्नाच्या बाबतीत सुगीचे मानले जातात. मात्र याच तीन महिन्यात तब्बल ४00 कोटींचा फटका बसला आहे. गतवर्षी केवळ मे महिना नफ्याचा राहिला. दोन महिने तोट्यात राहिल्यानंतरही महामंडळाने बोध घेतला नाही. परिणामी यावर्षी मे महिनाही हातचा गेला.

गेली काही वर्षांपासून एसटी महामंडळाला नफ्याचे दिवस स्वप्नातही नाहीत. सन २0१२-१३ या आर्थिक वर्षात ७२२ कोटीने तोट्यात राहिलेल्या एसटीने नफा वाढविण्यासाठी किंवा तोटा कमी करण्यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना आखल्या नाहीत. परिणामी तोट्याचा आकडा फुगत चालला आहे. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात लग्नाचा ठोक अधिक राहात असल्याने बसेस प्रवाशांनी खचाखच भरून धावतात. पण, यावर्षी एसटी महामंडळाला ही गर्दी

एसटी महामंडळाच्या स्थापनेला येत्या १ जून रोजी ६६ वर्षे पूर्ण होत आहेत.

‘कॅश’ करता आली नाही. ‘प्रवाशांच्या सेवेत’ हे ब्रीद घेवून रस्त्यावर धावणार्‍या एसटीने प्रत्यक्ष चांगली सेवा पुरविली नाही. अलीकडे यात कमालीची अनियमितता आली आहे. नियोजनाचा अभाव, बसेसचा तुटवडा, भंगार बसेस आदी कारणांमुळे प्रवासी एसटीपासून तुटत गेले आहे. यात भरीसभर म्हणजे अवैधरीत्या चालणारी खासगी वाहने, मनुष्यबळाचा तुटवडा हे एक कारणही एसटी महामंडळाच्या अधोगतीला नेण्यास कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते. एकट्या यवतमाळ विभागात ८0 चालक, १५0 वाहक मंजूरीपेक्षा कमी आहेत. यांत्रिक कामगारांची संख्या तर ५0 टक्क्यांवर पोहोचली आहे. परिणामी प्रवाशांना दज्रेदार सेवा मिळत नाही. तोटा वाढत असल्याने एसटी महामंडळ डिझेलचेही पैसे वेळेवर देत नाही. याशिवाय कामगारांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम चार-चार महिने वाटप करत नाही. सेवानवृत्त झालेल्या कामगाराला नवृत्तीच्या दिवशीच उपदानाची रक्कम दिली जावी, असा निर्णय असतानाही अनेक दिवसपर्यंत त्याला महामंडळाच्या कार्यालयात येरझारा माराव्या लागतात. हक्काच्या पैशांसाठी त्यांची पायपीट सुरू आहे.