शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या चालक- वाहकांना नवा गणवेश

By admin | Updated: September 20, 2016 04:56 IST

एसटीच्या चालक, वाहकांसह यांत्रिकी विभागातील कामगारांसाठी गणवेश डिझाइन ठरवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून एनआयएफटीशी बोलणी सुरू होती

मुंबई : एसटीच्या चालक, वाहकांसह यांत्रिकी विभागातील कामगारांसाठी गणवेश डिझाइन ठरवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून एनआयएफटीशी बोलणी सुरू होती. अखेर गणवेशाच्या डिझाइनवर एसटी महामंडळ आणि कामगार युनियनकडून सोमवारी झालेल्या सादरीकरणात शिक्कामोर्तब करण्यात आले. यात चालक-वाहकांसाठी खाकी रंगाच्या गणवेशाला अंतिम मंजुरी देण्यात आली. एसटीतील अधिकारी वर्गालाही गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी एनआयएफटीकडून खारघर येथील कार्यालयात गणवेशाच्या डिझाइनचे अंतिम सादरीकरण करण्यात आले. या वेळी परिवहनमंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते, एसटी व्यवस्थापकीय संचालक रणजिंत सिंह देओल उपस्थित होते. एसटीतील विविध कामगारवर्गांचे प्रतिनिधीही राज्यातून आले होते. चालक-वाहकांसाठी खाकी रंगाचा गणवेश असून त्यावर एसटीचा लोगो आणि त्यांचे नाव असेल. यांत्रिकी विभागांसाठीही गडद निळा आणि करड्या रंगाचा गणवेश ठरवण्यात आला आहे. हा गणवेश अग्निरोधक आहे. साहित्य ठेवण्याची सोयही या गणवेशात आहे. कामगारवर्गातील सर्वांचा गणवेश हा त्या-त्या पदांच्या दर्जानुसार असणार आहे. वरिष्ठ कामगारांसाठी गडद रंगाचा गणवेश असेल. त्याखालील स्तरावरील कामगारांसाठी फिकट रंगाचा गणवेश असेल. यामुळे प्रत्येक कर्मचारी पदानुसार ओळखता येईल. या वेळी अधिकारीवर्गासाठी गणवेश ठेवण्यावर निर्णय घेण्यात आला. मात्र त्यांच्या गणवेशाच्या डिझाइनला अंतिम स्वरूप देण्यात आले नाही. (प्रतिनिधी) >अंधारातही चालक-वाहक ओळखता येणारचालक-वाहकांच्या नव्या गणवेशांवर रेडियमच्या दोन पट्ट्या असतील. म्हणजे मार्गावर असतानाच एखादी बस रस्त्यात बिघडल्यास किंवा अपघात झाल्यास रात्री-अपरात्री अन्य वाहनांच्या चालकांना अंधारातही ते दिसू शकतील. >६७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांशी चर्चा करून गणवेश ठरवण्यात आला आहे, असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.