शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचे शांतीदूत सायकलवरून श्रीलंकेला

By admin | Updated: October 26, 2014 22:37 IST

‘पर्यावरण वाचवा, देश वाचवा’ हा संदेश देत त्या तिघांनी उपक्रम राबविला आहे.

शिरवळ : आजच्या युगात माणुसकी जोपासणे किती गरजेचे आहे. शांततामय जीवन जगणे किती फायद्याचे आहे. त्याचबरोबर निसर्गाला वाचविणेही तितकेच गरजेचे आहे. हा संदेश जगाला देण्यासाठी पुण्यातील त्रिमूर्ती शांतीदूत बनले आहेत. त्यांनी पुणे ते कोलंबो (श्रीलंका) सायकल प्रवास सुरू केला आहे. त्यांचे स्वागत शिरवळमध्ये उत्साहात करण्यात आले.पुणे येथील व्यवसायने चार्टड अकाउटंट असलेले श्रीरंग इथापे, कलाकार राज खेडेकर, शिक्षक राजेंद्र धायुगडे हे ‘शांतता व पर्यावरण वाचवा’ संदेश देत सायकल प्रवास सुरू केला आहे. हे तिघेही त्यांच्या त्याच्या क्षेत्रात स्थिरावलेले आहे. मात्र, सामाजिक व पर्यावरणप्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. निसर्गाचे मानवाशी असणारे नाते कशा प्रकारे दृढ करता येईल, यासाठी ‘पर्यावरण वाचवा, देश वाचवा’ हा संदेश देत त्या तिघांनी उपक्रम राबविला आहे. त्यांनी आजवर गोवा, अहमदाबाद, हिमाचल प्रदेश असा सायकलवर प्रवास केला आहे. हाच संदेश घेऊन त्यांनी आता पुणे ते श्रीलंका असा सायकल प्रवास सुरू केला आहे. श्रीरंग इथापे, राज खेडेकर, राजेंद्र धायगुडे यांचे रविवारी सातारा जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या शिरवळ शहरात आगमन झाले. त्यांचे फिरोज फरास, हाजी फैय्याज फरास यांनी स्वागत केले. ‘शांतता, समता व बंधुभावाचे वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही पुणे ते श्रीलंका असा सायकलप्रवास सुरू केला आहे,’ अशी माहिती श्रीरंग इथापे यांनी दिली. (प्रतिनिधी)