शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

बीकेसीमध्ये एसआरए घोटाळा

By admin | Updated: December 3, 2014 04:00 IST

एचडीआयएल कंपनीचे दहा संचालक, तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी आणि मोतीलाल नेहरू नगर गृहनिर्माण संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी यांनाही याप्रकरणात आरोपी करण्यात आले आहे

मुुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मोतीलाल नेहरूनगर झोपडपट्टीत राबविण्यात आलेल्या एसआरए योजनेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) विकासक एचडीआयएल कंपनीचे अध्यक्ष राकेशकुमार वाधवान यांच्यासह तत्कालीन एसआरए सीईओ देबाशिष चक्रवर्ती, उज्ज्वल उके यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला. एचडीआयएल कंपनीचे दहा संचालक, तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी आणि मोतीलाल नेहरू नगर गृहनिर्माण संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी यांनाही याप्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. भ्रष्टाचारासाठी बनावट कागदपत्रे तयार करणे, त्याचा वापर करून प्रकल्पासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळवणे, त्यासाठी कट रचणे, शासनाची आर्थिक फसवणूक करणे असे गंभीर गुन्हे या सर्वांविरोधात नोंदविण्यात आले आहेत. बीकेसीतल्या अत्यंत मोक्याच्या भूखंडावर वसलेल्या मोतीलाल नेहरू नगर झोपडपट्टीत २००४मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पात पात्र असूनही अपात्र ठरवून गाळा नाकारण्यात आलेल्या शमीम खान यांनी माहिती अधिकाराचा वापर करून हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आणला. एचडीआयएल कंपनीसोबत हातमिळवणी करून एसआरए, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कसा घोटाळा केला हे खान यांनी पुराव्यांसह एसीबीसमोर ठेवले आणि कारवाईची मागणी केली. मात्र एसीबीने कारवाई न केल्याने अखेर खान यांनी विशेष सत्र न्यायालयात खासगी तक्रार केली. तक्रारीची सुनावणी पूर्ण करून न्या. एस. व्ही रणपिसे यांनी याप्रकरणी दखलपात्र गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश एसीबीला दिले. त्यानुसार एसीबीने गुन्हा नोंदविला. या सुनावणीत अ‍ॅड. युसूफ खान आणि अ‍ॅड. अंजली अवस्थी यांनी तक्रारदाराच्यावतीने न्यायालयात युक्तिवाद केला.  मुळात ज्या भूखंडावर एसआरए प्रकल्प उभा राहिला त्या भूखंडाची मालकी एमएमआरडीएकडे आहे. त्यामुळे या भूखंडावरील नियोजन करण्याचे हक्क एसआरएकडे नसून एमएमआडीएकडे होते. शिवाय हा भूखंड गणनाकृत झोपडपट्टी (सेन्सस्ड स्लम) म्हणून जाहीर झालेला नव्हता. त्यामुळे या भूखंडावर एसआरए प्रकल्प होऊच शकत नव्हता.मात्र २००४मध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्याने हा भुखंड सेन्सस्ड स्लम असल्याचे खोटे प्रमाणपत्र दिले. त्याच प्रमाणपत्राच्या आधारे तत्कालीन एसआरए सीईओ आणि अन्य अधिकाऱ्यांनी एचडीआयएलला प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या दिल्या. प्रकल्पासाठी ७० टक्के झोपडीधारकांची मंजुरी आवश्यक असते. ही परवानगी मिळविण्यासाठी एचडीआयएल कंपनीने बनावट झोपडीधारक उभे केले. त्यासाठी त्यांनी बोगस रेशन कार्ड आणि लाईट बिले तयार करून घेतली. या रेशनकार्ड किंवा लाईट बिलांची शहानिशा उप किंवा अप्पर जिल्हाधिकारी करतात. त्यासाठी संबंधीत वीज कंपनी किंवा रेशनिंग विभागाकडून अहवाल मागविला जातो. मात्र या प्रकरणात असा कोणताही अहवाल न मागविताच सर्व झोपडीधारक पात्र आहेत असे जाहीर केले. एचडीआयएलने अवैधपणे २.५ एफएसआय मिळवून जास्तीचे बांधकाम केले. उभारलेल्या प्रकल्पातील विक्रीसाठी बांधलेले फ्लॅट विकलेच; पण प्रकल्पग्रस्तांचे फ्लॅटही विकले.