शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्यांनी पथक हादरले

By admin | Updated: December 15, 2014 04:30 IST

दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले केंद्रीय पथक रविवारी राज्यात झालेल्या ९ शेतक-यांच्या आत्महत्यांनी हादरले

औरंगाबाद : दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले केंद्रीय पथक रविवारी राज्यात झालेल्या ९ शेतक-यांच्या आत्महत्यांनी हादरले. औरंगाबादेत दुष्काळावर चर्चा सुरू असताना मराठवाड्यातच चार शेतकऱ्यांनी स्वत:ला संपविले.गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या जळगाव जिल्ह्यात एका महिलेसह तीन, तर नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी दुपारीच केंद्राचे पथक येथे दाखल झाले. पथकातील अधिकाऱ्यांनी आयुक्तालयात मराठवाड्यातील स्थितीची औरंगाबादचे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, नाशिक व अमरावतीचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले व ज्ञानेश्वर राजुरकर यांच्याकडून माहिती घेतली. सोमवारपासून हे पथक पाहणी करेल. (लोकमत न्यूज नेटवर्क) >मराठवाड्यात चौघांचा आत्मघातसंदीपवर कर्ज फेडण्याची विवंचना आर्थिक विवंचनेत सापडलेल्या संदीपने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले, असे त्याचे वडील गुणवंत बक्केवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. संदीपने मराठवाडा ग्रामीण बँकेच्या उमरी बाजार शाखेतून पीककर्ज घेतले होते़ त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे़> महिला शेतक-याचा मृत्यू पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने हताश झालेल्या महिला शेतकरी अन्नपूर्णा आनंदा चौधरी (४७, रा. जैतपीर, जळगाव) यांनी रविवारी संध्याकाळी स्वत:ला पेटवून घेतले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.