शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

‘संस्काराचे मोती’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: June 30, 2015 03:36 IST

लोकमतने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती जरा हटके’ या पानाला बालचमूंचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यातील प्रथम कुपन स्पर्धा येत्या १ जुलैपासून (बुधवार) सुरू होत आहे.

मुंबई : लोकमतने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती जरा हटके’ या पानाला बालचमूंचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यातील प्रथम कुपन स्पर्धा येत्या १ जुलैपासून (बुधवार) सुरू होत आहे. कुतूहल, कल्पकता आणि नावीन्याचा ध्यास मुलांमध्ये रुजवण्यासाठी ‘संस्काराचे मोती जरा हटके’मध्ये अनेक हटके कॉलम आहेत. तसेच संस्काराचे मोती स्पर्धेद्वारे मुलांच्या ‘जरा हटके’ विचारांना चालना देण्याचा प्रयत्न या माहितीद्वारे करण्यात येत आहे. १ जुलैपासून सुरू होणारी ही कुपन स्पर्धा १० आॅक्टोबरपर्यंत असेल. यातील विजेत्यांना हवाईसफर घडणार असून, इतरही अनेक आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आहे. यापूर्वीच्या विजेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना भेटण्याची संधी मिळाली होती. हवाईसफर, दिल्लीदर्शन तसेच नामवंत लोकांच्या भेटीने ही मुले भारावूनही गेली होती. यंदाही अशीच भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यंदा प्रथमच ही स्पर्धा खुली ठेवण्यात आली असून, राज्यातील सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येईल.लकी ड्रॉमध्ये ३६ भाग्यशाली विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल. यामध्ये लॅपटॉप, सायकल, स्मार्टफोन आणि टॅब जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविणाऱ्या प्रथम १२ शाळांना प्रोजेक्टर मिळेल. शिवाय स्पर्धेतील प्रत्येक शाळेतील प्रथम विजेत्यांना खेळण्यातील हेलिकॉप्टर, द्वितीय विजेत्यांना वॉल कार आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना टिफिन बॉक्स मिळेल. तसेच १० उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रमाणपत्रासह बक्षिसांचा लाभ घेता येईल. (विशेष प्रतिनिधी)