शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

हेल्दी बेबी कॅम्पला वसईत उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: August 23, 2016 03:17 IST

जॉन्सन अँण्ड जॉन्सन आणि लोकमत यांच्यातर्फे रविवारी नीलम-ए- पंजाब हॉल, वसई येथे आयोजित केलेल्या हेल्दी बेबी शिबिराला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

वसई : हसत्या खेळत्या बाळांच्या उज्ज्वल निरोगी भविष्यासाठी जॉन्सन अँण्ड जॉन्सन आणि लोकमत यांच्यातर्फे रविवारी नीलम-ए- पंजाब हॉल, वसई येथे आयोजित केलेल्या हेल्दी बेबी शिबिराला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी बालरोगतज्ज्ञांकडून बालकांची मोफत तपासणी करून आरोग्य सल्ला देण्यात आला.शिबिराची सुरु वात इंडियन अ‍ॅकॅडमी आॅफ पेडियाट्रिकच्या वसई शाखेचे अध्यक्ष डॉ. हेमंत जोशी यांनी केलेल्या दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी डॉ. अर्चना जोशी यांनी स्तनपानावर मार्गदर्शन केले. डॉ. जयश्री देशपांडे यांनी बाळांच्या आहाराविषयी योग्य काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. मौलिक शहा यांनी लसीकरणाच्या आवश्यकतेविषयी उपस्थितांना माहिती दिली. तर डॉ. अमित सामंत यांनी लहान मुलांना येणाऱ्या तापाबाबत काय काळजी घ्यावी या बद्दल मार्गदर्शन केले. डॉ. अंजली गोकर्ण यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लहान मुलांवर होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी डॉ. संजय वाघाणी, डॉ.सिल्विया गोन्सालवीस, डॉ. गौरी आळोज हे ही उपस्थित होते.एकूण तीन गटांमध्ये हे शिबिर घेण्यात आले होते. यासाठी ० ते १ वर्षे, १ ते ३ वर्षे, आणि ३ ते ५ वर्षे असे तीन गट केले होते.सकाळी १० वाजल्यापासूनच शिबिराच्या ठिकाणी नोंदणीसाठी पालकांनी चिमुकल्यांसह गर्दी केली होती. या वेळी डोरेमॉन कार्टुन ने सर्वांचे स्वागत केले, त्यामुळे वातावरण हर्षोल्हासित झाले होते. हा उत्साह शिबिर संपेपर्यंत टिकून होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी चिमुकल्यांसाठी विविध खेळण्यांची व्यवस्था केली होती. कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या कुटुंबाचे छायाचित्र काढून आकर्षक फ्रेममध्ये मढवून ते त्यांना सप्रेम भेट म्हणून देण्यात आले. या शिबिरात शेकडो बालकांची तपासणी करण्यात आली. यावेळी प्रत्येक सहभागी बालकास सहभाग प्रमाणपत्र आणि जॉन्सनतर्फे हेल्थ किट सप्रेम भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य जोशी यांनी केले. (इव्हेंट प्रतिनिधी)