शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसमर्पित नक्षल्यांना घरे देण्याच्या कामाला गती

By admin | Updated: September 3, 2014 01:13 IST

नक्षल चळवळीचा पूर्णत: बिमोड करण्यासाठी शासनाने आणखी पुढाकार घेत आता सुधारीत आत्मसमर्पण योजना सुरु केली आहे. नक्षल चळवळ सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात येणाऱ्या आत्मसमर्पित

५.५३ हेक्टर जमीन अधिग्रहीत : १७१ भूखंडाचे होणार वितरणगडचिरोली : नक्षल चळवळीचा पूर्णत: बिमोड करण्यासाठी शासनाने आणखी पुढाकार घेत आता सुधारीत आत्मसमर्पण योजना सुरु केली आहे. नक्षल चळवळ सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात येणाऱ्या आत्मसमर्पित नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. ही चळवळ सोडून आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांना आता हक्काचे घर मिळणार आहे. त्यासाठी शासनाने ५.५३ हेक्टर जमीन अधिग्रहीत केली असून आत्मसमर्पीत नक्षल्यांसाठी १७१ भूखंड वितरीत करण्यात येणार आहे. या भूखंडावर शासनाकडून मोफत घरकूल बांधून मिळणार आहे. भूखंडाच्या मोजमापाच्या कामास गती आली आहे.चळवळीत सक्रीय असलेल्या नक्षल्यांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन स्वत:चा विकास करावा. तसेच सुखी जीवन जगावे यासाठी शासनाने २९ आॅगस्ट २००५ पासून नक्षल्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरु केली. या योजनेंतर्गत आत्मसमर्पीतांना ठराविक रक्कम, भूखंड, घरकूल, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड आदी सुविधा देण्यात येत आहे. या व्यापक योजनेकडे नक्षलवाद्यांचा आत्मसमर्पण करण्याचा कल वाढला आहे. चळवळीतील अनेक नक्षलवादी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आत्मसमर्पण करीत आहेत. गत वर्षी २०१३ मध्ये सर्वाधिक ४८ नक्षल सदस्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पीत नक्षली हे नेहमीच चळवळीतील नक्षल्यांचे लक्ष्य असतात. नक्षल्यांकडून त्यांना जीवे मारण्याची भीती असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरालगतच आत्मसमर्पित नक्षल्यांचे पुनर्वसन करण्याचे शासनाचे धोरण आहे. याच उद्देशाने गडचिरोली पोलीस मुख्यालयापासून अवघ्या एक किलोमीटर परिसरात शासनाने आत्मसमर्पीत नक्षल्यांच्या भूखंडासाठी १६६/१ (३.५३ हेक्टर) व १६७ (२ हेक्टर) क्रमांकाचे दोन मोठे भूखंड अधिग्रहीत केले आहे. जवळपास १४ एकर क्षेत्रफळ असलेल्या या जमिनीवर आत्मसमर्पीत नक्षल्यांना एकूण १७१ भूखंडाचे वाटप होणार आहे. २००५ पासून आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांना प्रत्येकी १ हजार २५० चौ.फूट क्षेत्रफळाचा भूखंड मोफत मिळणार असून त्यावर इंदिरा आवास योजना व रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलसुध्दा बांधून मिळणार आहे. यासाठी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जमिनीचे मोजमाप करणे सुरु झाले आहे. शासनाने हक्काचा निवारा दिल्यामुळे आत्मसमर्पीत नक्षल्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच चळवळीतील इतर नक्षल्यांनीसुध्दा आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन पोलीस व आत्मसमर्पीत नक्षल्यांनीसुध्दा चळवळीत काम करणाऱ्या नक्षलवाद्यांना केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)