शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

मिहानला गती द्या, वीजप्रश्न सोडवा!

By admin | Updated: June 15, 2014 00:38 IST

मिहान प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रसंगी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन स्थानिकांशी बोलणी करून आणि चर्चेच्या मार्गाने अडचणी सोडविण्याची विनंती केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी

आढावा बैठक : नितीन गडकरी यांची अधिकाऱ्यांना विनंती नागपूर : मिहान प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रसंगी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन स्थानिकांशी बोलणी करून आणि चर्चेच्या मार्गाने अडचणी सोडविण्याची विनंती केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांना रविभवन येथे शनिवारी झालेल्या बैठकीत केली. छोट्या समस्या निकाली काढागजराज प्रकल्पाची जमीन, बोर्इंग प्रकल्पाचा टॅक्सी-वे, झुडपी जंगल आणि पुनर्वसनाच्या प्रश्नावर विस्तृत चर्चा झाली. गडकरी यांनी बैठकीत सांगितले की, मिहान हा आंतरराष्ट्रीय स्तराचा प्रकल्प असून विदर्भासाठी महत्त्वाचा आहे. या प्रकल्पात मोठे उद्योजक आले तरच या भागाचा विकास होईल आणि युवकांना रोजगार मिळेल. शिवाय चांगला संदेश देशात जाईल. यासाठी कायद्यावर बोट ठेवून प्रत्येक प्रश्न सुटणार नाही. घरांचे पुनर्वसन असो की शेतकऱ्यांना देण्यात येणारा जमिनीचा दर असो, हे प्रश्न चर्चेतूनच सुटणार आहे. प्रसंगी विभागीय स्तरावर जिल्हाधिकारी आणि एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठकी घ्याव्यात. केंद्र स्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलणी करू. मिहान प्रकल्पासाठी अनेक वर्षे निघून गेली आहेत. मिहान प्रकल्पाचा विकास झालाच पाहिजे, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. प्रारंभी एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात असलेल्या गजराज प्रकल्पाचा २७८ हेक्टर जागेचा मुद्दा उपस्थित केला. २००९ मध्ये एमएडीसीने संरक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. आता त्यात काही बदल मंत्रालयाकडून मागितले जात आहे. हा प्रश्न सुटावा, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय मिहानमधील २०.१३ हेक्टर झुडपी जंगलाचा प्रश्न सुटावा, अशी विनंती अधिकाऱ्यांनी बैठकीत केली. मिहान या जागेच्या बदल्यात ४० हेक्टर जागा वन विभागाला देण्यास तयार आहे. पण वन विभागाला सात बाराच्या उताऱ्यावर वन विभाग, असे लिहून हवे आहे. चिचभुवन येथील पिवळ्या पट्ट्यातील घरांचा प्रश्न चर्चेद्वारे सोडविण्याची विनंती गडकरी यांनी केली. वर्धा महामार्गावरील घरांचा प्रश्न सोडविण्यास सांगितले. वीजप्रश्न चर्चेद्वारे सोडवामिहानमधील विजेचा प्रश्न चर्चेद्वारे सोडविण्याचे आवाहन गडकरी यांनी केले. अभिजित समूहातर्फे निर्मित वीज मिहानमधील उद्योजकांना द्यावी आणि उर्वरित वीज महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने ठरविलेल्या किमान दराने बाहेर विकण्यास परवानगी द्यावी, असे गडकरी यांनी सुचविले. कारण येथील उद्योजकांना महावितरणची वीज ७ ते ८ रुपये प्रति युनिट दराने मिळणार आहे. ही वीज उद्योजकांना परवडणारी नाही. समूहातर्फे मिळणाऱ्या विजेचा दर ३.५० रुपये पडेल, शिवाय त्यांना ४ ते ५ रुपये बाहेर विकण्यास मुभा द्यावी. जेणेकरून काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विजेच्या प्रश्नावर तोडगा निघेल आणि चांगला संदेश बाहेरच्या उद्योजकांमध्ये जाईल. त्यामुळे मिहानमध्ये गुंतवणूक वाढेल, असे गडकरी यांनी सांगितले.‘टॅक्सी-वे’ला गती द्या‘बोर्इंग एमआरओ’साठी बांधण्यात येणाऱ्या ‘टॅक्सी-वे’ला गती देण्याचे आवाहन गडकरी यांनी केले. ‘टॅक्सी-वे’त अडसर ठरलेली बापू डवरे यांची ०.९३ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यासाठी डवरे यांना जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची विनंती केली. हा प्रश्न निकाली निघाल्यास बोर्इंग प्रकल्पाला गती मिळेल.खापरी येथील घरांचे पुनर्वसनम्हाडा जमिनीचे हस्तांतरण व शिवणगावचा प्रश्नखापरी येथील ५९ घरे आणि मिहान प्रकल्पांतर्गत असलेल्या म्हाडाच्या ७० घरांच्या पुनवर्सनाचा प्रश्न चर्चेत आला. यावर आ. चंद्रशेखर बावनकुळे हा प्रश्न सोडविण्याची तयारी दर्शविली. म्हाडा येथील रहिवाशांना मिहान बाहेर जागा उपलब्ध करून देण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली. म्हाडाच्या १६ एकर जमिनीच्या बदल्यात केवळ ४ एकर जागा लोकांना द्यावी लागणार आहे. हा प्रश्न प्रलंबित ठेवू नये, अशी विनंती गडकरी यांनी अधिकाऱ्यांना केली. याशिवाय तेल्हारा, कलकुही, दहेगाव, शिवणगाव (गावठाण) येथील घरांच्या प्रश्नावर चर्चा झाली. शिवणगाव येथील रहिवाशांची यादी शासनाने चुकीची तयार केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी केला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: गावात जाऊन पाहणी करावी आणि स्थिती जाणून घ्यावी, अशी विनंती गडकरी यांनी केली. बैठकीत जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, मनपा आयुक्त श्याम वर्धने, आ. सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकल्पग्रस्तांचे नेते बाबा डवरे, विजय राऊत, बापू डवरे यांच्यासह एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष तानाजी सत्रे, मुख्य अभियंते आर. चहांदे तसेच मनोहर हिकरे, आबीद रुही, अतुल ठाकरे आणि मिहान इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर भोजवानी, अभिजित समूहाचे अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)