नवी दिल्ली : महागाई आणि व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा आणि नवीन सरकारकडून असलेल्या मोठय़ा अपेक्षांच्या जोरावर ऑटोमोबाईल्स क्षेत्र वेग पकडत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरत असलेली देशातील कारविक्री मे महिन्यात काहीशी वाढली आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल उद्योगाला ‘अच्छे दिन ’ची प्रतीक्षा आहे.
गेले काही महिने देशातील वाहन उद्योग हा विविध समस्यांना तोंड देत होता. विक्रीमध्ये होत असलेली घट ही सर्वात मोठी डोकेदुखी होती. नुकत्याच जाहीर झालेल्या मे महिन्याच्या आकडेवारीने मात्र या उद्योगाला हुरूप आला आहे. मे महिन्यात देशामधील कार आणि बहुउपयोगी वाहने (एमयूव्ही)यांच्या विक्रीत वाढ झालेली दिसून आली.
मारुती सुझुकी, हय़ुंदाई, होंडा आणि फोर्ड इंडिया या कांपन्यांच्या कारविक्रीमध्ये मे महिन्यात मोठी वाढ झाली आहे. मात्र महिंद्र अॅण्ड महिंद्र, टाटा मोटर्स आणि जनरल मोटर्स या कंपन्यांची विक्री मात्र कमी झाली आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीच्या विक्रीत मे महिन्यात 19.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशांतर्गत वाढ 16.47 टक्के असल्याचे या कंपनीने स्पष्ट केले आहे. या काळात निर्यात मात्र 51.2 टक्क्यांनी वाढल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4देशातील दुस:या क्रमांकाची कार उत्पादक कंपनी असलेल्या हय़ुंदाई मोटर इंडियाची मे महिन्यातील देशांतर्गत विक्री 12.8 टक्क्यांनी वाढली आहे, मात्र कंपनीची निर्यात 37.3 टक्क्यांनी घटली आहे.