शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे, मुंबईसाठी विशेष रेल्वेगाड्या

By admin | Updated: September 19, 2014 00:56 IST

सुट्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सर्वाधिक गर्दीच्या पुणे, उधना आणि मुंबई मार्गावर विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांसाठी सुविधा : सुट्यांमधील गर्दी पाहून निर्णयनागपूर : सुट्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सर्वाधिक गर्दीच्या पुणे, उधना आणि मुंबई मार्गावर विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१२३६ नागपूर-पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस नागपूरवरून १५ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक बुधवारी सकाळी ११ वाजता सुटून ही गाडी पुण्याला दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ५.१० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०१२३५ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी पुण्यावरून १६ आॅक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक गुरुवारी सकाळी ६.१५ वाजता सुटून नागपूरला त्याच दिवशी रात्री १०.१० वाजता पोहोचेल. या गाड्यांना वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, दौंड येथे थांबा देण्यात आला आहे. याशिवाय नागपूर-मुंबई दरम्यान आठ साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. रेल्वेगाडी क्रमांक ०१०१४ नागपूर-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ही गाडी नागपूरवरून १९ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक रविवारी दुपारी ४.१५ वाजता सुटून मुंबईला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०१०१३ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-नागपूर साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी मुंबईवरून १९ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक रविवारी मध्यरात्री १२.२० वाजता सुटून नागपूरला दुपारी ३ वाजता पोहोचेल. या गाड्यांना वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नासिक, इगतपुरी, कल्याण, ठाणे, दादर येथे थांबा देण्यात आला आहे. याशिवाय नागपूर-उधना चार विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. रेल्वेगाडी क्रमांक ०१४५३ नागपूर-उधना साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी नागपूरवरून २४ सप्टेबर ते १ आॅक्टोबर दरम्यान नागपूरवरून दुपारी ३ वाजता सुटून उधनाला दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०१४५४ उधना-नागपूर साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी २५ सप्टेबर ते २ आॅक्टोबर दरम्यान सकाळी ६ वाजता सुटून नागपूरला रात्री १०.२० वाजता पोहोचेल. या गाड्यांना वर्धा, पुलगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, अमळनेर, नंदूरबार येथे थांबा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)