शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांच्या पुस्तकांचे विशेष दालन

By admin | Updated: April 11, 2015 05:46 IST

मुंबई विद्यापीठातील पंडित जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचे विशेष दालन सुरू करण्याची घोषणा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ

मुंबई : मुंबई विद्यापीठातील पंडित जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचे विशेष दालन सुरू करण्याची घोषणा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र यांनी गुरुवारी केली. महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या फुले आणि आंबेडकर यांच्या दुर्मीळ व नवीन पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.कलिना कॅम्पस्मध्ये भरविण्यात आलेले हे प्रदर्शन १४ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत सर्वांसाठी खुले असून, यामध्ये महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांची आणि त्यांच्यावर लिहिण्यात आलेली मराठी, इंग्रजी, कन्नड व गुजराती भाषांमधील दुर्मीळ पुस्तके पाहता येणार आहेत. तसेच डॉ. आंबेडकरांची मूळ हस्ताक्षरातील काही पत्रेही प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे बहिष्कृत भारत, समता यांचे मूळ अंक तसेच डॉ. आंबेडकरांचे महाराष्ट्र अ‍ॅज अ लिंगविस्टिक प्रोव्हिन्स हा भाषिक राज्य पुनर्रचना आयोगाला दिलेला अहवाल, १९४८ साली तयार केलेली घटनेच्या मसुद्याची प्रत असे अनेक दुर्मीळ ग्रंथ प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहेत.या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये मुंबई विद्यापीठाने जागतिक दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र सुरू करणार असून, याचा उद्देश देशातून व परदेशातून अनेक तज्ज्ञ व अभ्यासकांनी येथे येऊन संशोधन व अभ्यास करावा, हा असल्याचे नरेश चंद्र यांनी या वेळी सांगितले.याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय केंद्राचे प्रमुख व प्राध्यापक डॉ. सुरेद्र जोंधळे यांचेही भाषण झाले. तसेच कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. उद्घाटन समारंभाप्रसंगी १७ डिसेंबर १९४६ रोजी संसदेमध्ये डॉ. आंबेडकरांनी केलेल्या व त्यांच्याच आवाजातील भाषणाचा संपादित अंश ऐकविण्यात आला.