शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बीबीएफ यंत्राने पेरणी करा : होटकर

By admin | Updated: July 1, 2016 01:50 IST

परंपरागत पाभरीऐवजी बीबीएफ म्हणजे ‘ब्रॉड बेस फरो’ या यंत्राच्या साह्याने पेरणी करून आपला वेळ, मजुरी व पैशांची बचत करावी

राजगुरुनगर : परंपरागत पाभरीऐवजी बीबीएफ म्हणजे ‘ब्रॉड बेस फरो’ या यंत्राच्या साह्याने पेरणी करून आपला वेळ, मजुरी व पैशांची बचत करावी, असे आवाहन खेडचे कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर यांनी केले आहे.खेड तालुक्यात पावसाने काहीशी हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू केली आहेत. पेरणी करताना ती बीबीएफ या उपकरणाच्या साह्याने केल्यास वेळेची व पैशांची मोठी बचत होते. पेरणी करताना एकाच वेळी बियाणे आणि खते त्यामधून टाकता येतात. तसेच, योग्य अंतरावर बी टाकले जात असल्याने त्यात बचत होते व उत्पन्नातही वाढ होते. तसेच, खतही या यंत्रामुळे खोलवर जाते व पिकाला जास्त फायदा होतो. परंपरागत प्रकारात शेतकरी खत मातीवर पांगवतात; त्यामुळे काही खत वाया जाते. यामुळे काही तासांत पेरणीचे काम पूर्ण होते. पाभरीच्या तुलनेत बीबीएफ पेरणी यंत्र फारच कमी वेळ घेत असल्याने त्या यंत्राने पेरणी केल्यास शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचणार आहे. यामुळे हे पेरणी यंत्र शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. या यंत्राच्या साह्याने बहुतेक पिकांच्या बियाण्याची पेरणी करता येते.या यंत्राची प्रात्यक्षिके कृषी विभागामार्फत ठिकठिकाणी दाखविली जात आहेत. अनेक शेतकरी ते वापरू लागले आहेत. यामुळे बियाणे आणि खतामध्ये कशी बचत होते, हे दाखविले जात आहे. शेतकऱ्याचा वेळ, मजुरी आणि पैशांची मोठी बचत होत असल्याने शेतकऱ्यांनी या पेरणी यंत्राचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन कृषी अधिकारी होटकर यांनी केले आहे. हे यंत्र खेड पंचायत समितीत उपलब्ध असून, शेतकऱ्यांना अनुदानावर मिळू शकते. त्याची किंमत ४८,००० रुपये आहे. पण, ५० टक्के अनुदानामुळे हे यंत्र २४,००० रुपयांना मिळू शकते. खेड तालुक्यात भुईमूग आणि सोयाबीनचे मोठे क्षेत्र आहे. खेड तालुक्यात २,५०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते, तर सुमारे ७,००० हेक्टरवर भुईमूग घेतला जातो. बीबीएफ या यंत्राने शेतकऱ्यांनी या पिकांची पेरणी केल्यास त्यांच्या फायद्याचे आहे. या यंत्राच्या साह्याने पेरणीला वेळ लागत नाही, असे त्यांनी सांगितले.