शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नैऋत्य मान्सून १५ मे रोजी दक्षिण अंदमानात होणार दाखल

By admin | Updated: May 10, 2017 19:56 IST

नैर्ऋत्य मोसमी वारे अंदमानात दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण होत आहे

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 10 - नैऋत्य मोसमी वारे अंदमानात दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण होत आहे, मान्सून दक्षिण अंदमानाच्या समुद्रात आणि निकोबार बेटाच्या परिसरात येत्या 15 मेच्या आसपास दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या देशभरात उन्हाच्या तीव्र झळा असताना हवामान विभागाने ही आनंदाची बातमी दिली आहे, गेल्या महिन्यात मान्सूनचा प्राथमिक अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने तो 96 टक्के होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि गेल्या तीन आठवड्यांत परिस्थिती अनुकूल झाल्याने यंदा देशात सरासरीहून जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा सुधारित अंदाज हवामान विभागाने मंगळवारी वर्तविला आहे.सर्वसाधारणपणे दक्षिण पश्चिम मान्सूनचे आगमन 20 मे रोजी अंदमानच्या समुद्रात होते. त्यानंतर 25 मेपर्यंत अंदमान बेट, श्रीलंकापासून म्यानमारपर्यंत आगमन होते. त्यानंतर 1 जून रोजी केरळ येथून प्रत्यक्ष भारतीय उपखंडात मान्सूनचा प्रवेश होतो़ त्यात काही वेळा पुढे मागे होत आला आहे. आताची पोषक स्थिती लक्षात घेता दरवर्षीपेक्षा साधारण 5 दिवस मान्सूनचे आगमन लवकर होत असल्याचे दिसून येत आहे. त्याची पुढील वाटचाल कशी असेल यावर तो केरळला आणि महाराष्ट्रात कधी पोहोचेल, हे समजून येणार आहे. सध्या तरी सर्वांसाठी मान्सूनचे आगमन होत असल्याची चांगली खूशखबर आहे. पुढील वाटचाल महत्त्वाचीआपल्याकडे अंदमान बेटानजीक 15 ते 20 मेच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होत असते. त्यात 4- 5 दिवसांचा फरक असतो, हे लक्षात घेता त्याला उशीर न होता, तो वेळेवर येत असल्याचे संकेत आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पुढील 10 ते 15 दिवसांत त्याची वाटचाल कशी होते आणि त्याचे केरळला कधी आगमन होते, याकडे आता आपले लक्ष राहील. केरळला मान्सूनचे आगमन कधी होईल, याचा अंदाज व्यक्त करताना 15 मेपर्यंतची स्थिती कशी आहे, हे लक्षात घेतली जाते. सध्या तरी मान्सून वेळेवर येत असल्याचे आपल्यासाठी महत्वाचे आहे.डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ