शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटप ठरल्यानुसारच!

By admin | Updated: November 22, 2015 01:50 IST

राज्याच्या मंत्रिमंडळात कुणाला किती जागा द्यायच्या याचा अजेंडा आधीच ठरला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारही आधी ठरल्याप्रमाणेच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- गोपालकृष्ण मांडवकर,  चंद्रपूर

राज्याच्या मंत्रिमंडळात कुणाला किती जागा द्यायच्या याचा अजेंडा आधीच ठरला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारही आधी ठरल्याप्रमाणेच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी हा विस्तार होण्याचे संकेतही त्यांनी दिले.चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या मोहर्ली येथे आयोजित दोन दिवसीय पर्यावरण पर्यटन आणि समुदाय निसर्ग प्रोत्साहन कार्यशाळेच्या समारोपासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले होते. त्या वेळी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून कॅबिनेटपदांवर दावा केला जात असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तारापूर्वी आपल्या पक्षाची बैठक घेऊन खातेवाटपाबद्दल ठरविले जाणार आहे. शिवसेनेकडून अधिक जागांची मागणी होत असली तरी युती केली तेव्हाच कुणाला किती जागा द्यायच्या याबद्दल सारेच ठरले आहे. त्यामुळे आता त्यावर नव्याने कुणी चर्चा उकरून काढण्यात अर्थ नाही. तूरडाळीचा दर अद्यापही उतरला नसल्याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले, डाळीचा देशात तुटवडा आहे. डाळ उत्पादक राज्यात महाराष्ट्र आघाडीवर असला तरी सततच्या दोन हंगामांतील नापिकीमुळे उत्पादन खालावले आहे. देशात २५० लाख मेट्रीक टन डाळीची गरज आहे. त्यातही ५० लाख मे. टन डाळीची आयात करावी लागते. मात्र ज्या देशातून डाळीची आयात होते, त्या देशातील हंगामात आणि आपल्या हंगामात तीन महिन्यांचे अंतर असल्याने आयातीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. शेतकऱ्यांप्रति राज्य सरकार संवेदनशीलदुष्काळी मदतीवर जनता नाखुश असल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले, आपले सरकार शेतकऱ्यांप्रति संवेदनशील आहे. महसुली अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या गावांच्या यादीनुसार दुष्काळाची घोषणा सरकारने केली आहे. गतवर्षी ८ हजार कोटी रुपयांची मदत सरकारने शेतकऱ्यांंना केली. केंद्राने फक्त २ कोटींचा निधी देऊनही राज्याने अधिकचा निधी यासाठी दिला. आपल्या सरकारने ८ हजार कोटींची मदत केली असली तरी गेल्या सरकारने १५ वर्षांत फक्त १३ हजार कोटींची मदत दिली, अशी टीकाही त्यांनी केली.