शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

सोनिया गांधी, मनमोहनसिंग उद्या नांदेडमध्ये

By admin | Updated: July 13, 2016 03:43 IST

काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ़ शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच स्मृती संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष खा़ सोनिया गांधी तसेच माजी

नांदेड : काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ़ शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच स्मृती संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष खा़ सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान खा़ डॉ़ मनमोहनसिंग गुरुवारी नांदेड दौऱ्यावर येत आहेत़ या सोहळ्यासंदर्भात मंगळवारी पत्रपरिषदेत माहिती देताना माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण म्हणाले, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने साकारण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयाचे लोकार्पण तसेच डॉ़ चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोनिया गांधी यांच्या हस्ते होईल़ अध्यक्षस्थानी मनमोहनसिंग असतील.माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी राज्यपाल डी़ वाय़पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ तसेच माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विकास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष वैशालीताई विलासराव देशमुख यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, असे खा. चव्हाण म्हणाले.गुरुवारी सकाळी १० वाजता यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा होईल़ तत्पूर्वी पुतळ्याचे अनावरण व स्मृती संग्रहालयाचे लोकार्पण होईल़ या स्मृती संग्रहालयात डॉ़ शंकरराव चव्हाण यांची दुर्र्मीळ छायाचित्रे, साहित्यसंपदा तसेच महाराष्ट्राचा राजकीय इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला़ संग्रहालयाचे काम अजूनही सुरू असून त्यातील ठेवा अधिक समृद्ध करण्यासाठी सोसायटी प्रयत्नशील असल्याचे चव्हाण यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)