शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
3
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
5
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
6
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
7
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
9
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
10
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
11
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
12
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
13
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
14
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
15
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
16
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
17
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
18
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
19
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
20
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत सौरपंप

By admin | Updated: October 22, 2015 01:14 IST

राज्यातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरायची असून, प्रथम

मुंबई : राज्यातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरायची असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि वर्धा या सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विद्युत जोडणी नसल्यामुळे शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर विपरित परिणाम होऊ नये, तसेच कृषिपंपाला किफायतशीर वीजपुरवठा मिळावा व विजेचे बील भरण्यापासून त्याची कायमस्वरुपी सुटका व्हावी, यासाठी शासनाने १0 हजार सौर कृषिपंप बसविण्याचा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार ३ ते ५ अश्वशक्तीचेहे कृषिपंप पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात बसविले जाणार आहेत. (प्रतिनिधी) महावितरणकडून घेता येणार लाभ शासनाच्या धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरीचा लाभ घेतलेले शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेली गावे, विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले भाग व महावितरणकडे पैसे भरून ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे नजीकच्या काळात वीजपुरवठा करणे शक्य नसलेले सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात, असे महावितरणने कळविले आहे. ३ अश्वशक्ती ए.सी.पंपासाठी शेतकऱ्यांना १६ हजार २00 रुपये भरावे लागणार आहेत, तर ३ अश्वशक्ती डी.सी.पंपासाठी २0 हजार २५0, ५ अश्वशक्ती पंपासाठी २७ हजार, ५ अश्वशक्ती डी.सी.पंपासाठी ३३ हजार ७५0 आणि ७.५ अश्वशक्ती ए.सी.पंपासाठी ३६ हजार रुपये शेतकऱ्यांना जमा करावे लागणार आहेत. हे सौर कृषिपंप बसविल्यापासून पाच वर्षे देशभाल दुरुस्तीची पूर्ण जबाबदारी पुरवठादार एजन्सीची राहणार आहे.