शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

प्रवासी गाड्यांवर लावणार सौर पॅनल

By admin | Updated: July 1, 2015 01:42 IST

इंधनबचतीच्या दिशेने रेल्वेची वाटचाल.

राम देशपांडे /अकोला : प्रवासी गाड्यांमधील वातानुकूलित प्रणाली, पंखे, प्रकाश व्यवस्था व चार्जिंग पॉइंटकरिता लागणारी वीज, प्रवासी डब्यांच्या छतावर सोलर पॅनल लावून निर्माण करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. यातून वीज आणि इंधनाची मोठी बचत करता येईल. बेंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेतील वैज्ञानिकांनी यशवंतपूर-भोपाल एक्स्प्रेस आणि चेन्नई-कोयंबतूर शताब्दी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांना जोडलेल्या विशेष डब्यांवर प्रत्येकी १८0 वॉट क्षमतेचे सोलर पॅनल लावून याची यशस्वी चाचणी घेतली. रेल्वेच्या चेन्नई येथील कोच निर्माण फॅक्टरीमध्ये निर्माण करण्यात आलेले सोलर पॅनल ज्या दोन्ही गाड्यांवर प्रयोगाखातर लावण्यात आले होते, त्यापासून निर्माण झालेले विजेचे प्रमाण वैज्ञानिकांना थक्क करणारे ठरले. प्राथमिक स्वरूपात घेण्यात आलेल्या या चाचणीतील आकडेवारीवर वातावरणाचा तसेच गाडीच्या वेगावर काय प्रभाव पडतो, याचीदेखील तपासणी वैज्ञानिकांमार्फत घेतली जात आहे. प्रवासी डब्यांच्या छतांवर लावलेले सोलर पॅनल ज्याप्रमाणे उन्हाळय़ात काम करते, त्याच क्षमतेने पावसाळय़ात आणि हिवाळय़ात काम करतील की नाही, याचीदेखील विशेष तपासणी वैज्ञानिकांमार्फत घेतली जात असून, अंतिम निष्कर्ष हाती लागताच हा प्रयोग अंतिम केला जाणार असल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वेद्वारा चालविल्या जाणार्‍या राजधानी, शताब्दी, दुरंतो तसेच गरीबरथसारख्या गाड्यांना दोन पॉवर कार लावल्या जातात. प्रवासी डब्यांच्या छतांवर सोलर पॅनल लावून ही गरज संपुष्टात आणल्यास वर्षाकाठी सव्वा कोटी लीटर डिझेलची बचत रेल्वे करू शकेल, असा अंदाज अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. पॉवर कारची गरज संपल्यास त्या जागी प्रवासी डबे जोडून रेल्वेच्या उत्पन्नातदेखील भर पडू शकते, असा अंदाजही अधिकार्‍यांनी व्यक्त केला.