शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर : गोळीबार करून एसटी लुटण्याचा प्रयत्न, 2 जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2016 13:09 IST

लकाच्या डोक्याला बंदुक लावून एसटीतील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न नाविंदगी फाटा (ता़ अक्कलकोट) येथे झाला.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ९ -  चालकाच्या डोक्याला बंदुक लावून एसटीतील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न नाविंदगी फाटा (ता़ अक्कलकोट) येथे झाला. यात दोघेजण किरकोळ जखमी झाले असून प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर चोरटे पसार झाल्याची माहिती एसटी विभागाने दिली़. ही घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली़ 
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, मंगळवार ९ आॅगस्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास एमएच १४ बीटी ०६९० या क्रमाकांची एसटी अक्कलकोटहुन हैद्राकडे जात होती़ या एसटीत एकूण ४५ प्रवासी होते़ यापैकी तिघां प्रवाशांनी नाविंदगी फाटयाचे तिकीटाची मागणी कंडक्टरकडे केली़ त्यानुसार कंडक्टरने तिकीट दिले़ नाविंदगी फाटा येताच चला नाविंदगी उतरा असे कंडक्टरने हाक देताच या तिघापैकी एकाने वाहन दिवटे यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावली़ यावेळी प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली़ यातील अन्य  दोघां चोरट्यांनी संपूर्ण एसटी बसमध्ये चटणी फेकून गोंधळ माजविला़ यावेळी एसटी हैद्रा येथील सराफ यांच्याकडील सोने, चांदी, रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला़ मात्र प्रवाशांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला़ मात्र चोरटे व सराफाच्या झटापटीत सराफ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़