शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

सोलापूर - १६१ वर्षाचा डिकसळचा धोकादायक पूल

By admin | Updated: August 6, 2016 15:06 IST

महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून मोठी दुर्घटना घडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याला जोडणारा भीमा नदीवरील डिकसळचा ब्रिटिशकालीन पूल चर्चेत आला आहे

करमाळा तालुका : २००० साली पुलाचे आयुष्य संपल्याचे ब्रिटिश कंपनीचे पत्र
नासीर कबीर / ऑनलाइन लोकमत -
करमाळा, दि. 6 - महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून मोठी दुर्घटना घडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याला जोडणारा भीमा नदीवरील डिकसळचा ब्रिटिशकालीन पूल चर्चेत आला आहे. ब्रिटिशांनी सन १८५५ साली भीमा नदीवर बांधलेल्या या पुलाचे वय १६१ वर्षे असून, सन २००० मध्ये ब्रिटिश सरकारने या पुलाचे आयुष्य संपले असून, वाहतुकीस धोकादायक असल्याचे केंद्र व राज्य सरकारला कळवलं आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून आजही या पुलावरून मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होत आहे तर या परिसरात भीमा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसाही सुरू आहे. 
 
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोली ते इंदापूर तालुक्यातील डिकसळच्या सीमेवरून वाहत जाणाºया भीमा नदीवर हा ब्रिटिशकालीन पूल असून, ब्रिटिशांनी १८५५ साली तो बांधला. पुणे जिल्ह्यातील भिगवणला जवळचा व एकमेव मार्ग म्हणून या पुलावरून करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील जिंती, कोंढारचिंचोली, टाकळी, केत्तूर नं. १ व २, वाश्ािंबे, गोयेगाव, कुंभारगाव, सावडी, दिवेगव्हाण, कात्रज, खातगाव, पोमलवाडी, हिंगणी, गुलमोहोरवाडी, भगतवाडी, घरतवाडी, राजुरी, सोगाव, रामवाडी, कावळवाडी, भिलारवाडी, उम्रड, मांजरगाव, उंदरगाव आदी ३५ गावांचा पुणे जिल्ह्यातील गावांशी दैनंदिन दळणवळणाचा संपर्क आहे. 
डिकसळच्या पुलाचे बांधकाम होऊन १६१ वर्षे पूर्ण झाली असून, या पुलाचे आयुष्यमान केव्हाच संपले आहे. पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे लेखी पत्र ब्रिटिश सरकारने १५ वर्षांपूर्वीच केंद्र व राज्य सरकारला पाठविले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने पुलाच्या दोन्ही टोकाला भीमा नदीवरील जुना रेल्वे पूल कमकुवत असल्याने जडवाहनासाठी धोकादायक जीप, कार, दुचाकी व जडवाहनासाठी वापर करू नये, असे धोक्याचे फलक लावून ठेवले आहेत. त्याची दखल घेऊन महामंडळाने एस.टी.ची वाहतूक बंद केली. पण सर्रास या पुलावरून करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातून बारामती अ‍ॅग्रो, दौंड शुगर, माळेगाव, भवानीनगर आदी साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक होते. 
 
खातगाव, कात्रज या भागातून भीमा नदीतील वाळू उपसा करून या पुलावरून जडवाहतूक सर्रास होते. पाच वर्षांपूर्वी कोंढारचिंचोली ते डिकसळ या रस्त्याच्या कामासाठी पुनर्वसन खात्याने दहा क ोटी रुपयांचा निधी खर्च करून पुलासह रस्ता सुस्थितीत केला. पण सध्या पुलावरून मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होत असल्याने पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पुलाचे कठडे तुटले आहेत. या परिस्थितीमध्येसुद्धा या पुलावरून बेमालूमपणे जीवाची पर्वा न करता जडवाहतूक सुरू आहे.