शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

माती नमुना तपासणी दुपटीने महागली !

By admin | Updated: July 22, 2014 00:05 IST

मृद सर्वेक्षण व मृद चाचणीत झाली दरवाढ

खामगाव : देशात बियाणे आणि इतर शेतीपयोगी वस्तूंच्या दरात दिवसागणिक वाढ होत आहे. ही वाढ शेतकर्‍यांच्या मुळावर उठली असताना, आता माती नमुना तपासणीच्या दरातही जवळपास दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे.पावसाचा लहरीपणा, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे गत काही वर्षांत शेतीच्या उत्पादनात घट झाली आहे. अशा परिस्थितीतही संकटाशी सामना करीत नव्या उमेदीने उभे राहण्याचा प्रयत्न शेतकरी करतातच. अस्मानी आणि सुलतानी संकटांशी झुंजताना, वाढती महागाई शेतकर्‍यांसाठी त्रासदायक ठरत आहे. बी-बियाणे, रासायनिक खते, औषध, कीटकनाशक यासारख्या शेतीपयोगी वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना आता जमिनीची सुपिकता तपासणेही महागात पडणार आहे.मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळांकरिता लागणारे काचेचे साहित्य व रसायनांची झालेली दरवाढ, आधुनिक उपकरणांची देखभाल आणि दुरूस्ती खर्चात झालेली वाढ, वाढलेले वीज दर तसेच कर्मचार्‍यांचे वेतन व भत्त्यात झालेली वाढ, आदी कारणांमुळे मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळांच्या माती नमुने तपासणी शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही शुल्कवाढ १८ जुलै २0१४ पासून लागू करण्यात येणार आहे.** राज्यातील २९ केंद्रांमध्ये सुधारित दरराज्यातील शेतकर्‍यांच्या शेतमातीचे नमुने तपासण्याच्या दरात शासनाने जवळपास दुपटीने वाढ केली असली तरी, पाणी नमुना चाचणीत शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. पाणी नमुना तपासण्यासाठी पूर्वी शंभर रूपये (प्रति नमुना) दर आकारला जायचा. आता पन्नास टक्के कमी म्हणजेच प्रति नमुना ५0 रूपये कमी करण्यात आले आहेत.पाणी तपासणीत दिलासामहाराष्ट्रात २९ ठिकाणी मृद सर्वेक्षण व मृद चाचणी तपासणी प्रयोगशाळा आहेत. या शाळांमध्ये सर्वसाधारण मृद नमुन्यांची तपासणी, सूक्ष्म मूलद्रव्ये मृद, विशेष मृद नमुना आणि सिंचनाच्या उपयोगासाठीच्या पाण्याच्या नमुना तपासणीकरिता सुधारित शुल्क आकारण्यास शासन मान्यता देण्यात आली.