शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

समाजाने गौरवशाली इतिहास जपावा!

By admin | Updated: December 28, 2014 01:23 IST

जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. उलट इतिहासजमा होतो़ म्हणून समाजाने आपला गौरवशाली इतिहास जपला पाहिजे,

लातूर (स्वातंत्र्यसैनिक स्व. जगन्नाथराव कडतणे नगरी) : जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. उलट इतिहासजमा होतो़ म्हणून समाजाने आपला गौरवशाली इतिहास जपला पाहिजे, असे प्रतिपादन शरदचंद्र गांधी यांनी केले. महाराष्ट्र जैन इतिहास परिषद आणि सकल जैन समाज आयोजित दहाव्या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात शनिवारी ते बोलत होते. मंचावर संमेलनाध्यक्ष सुजाता शास्त्री, स्वागताध्यक्ष सुनील कोचेटा, मावळत्या संमेलनाध्यक्षा कविता तातेड, नलिनी जोशी, परिषदेचे अध्यक्ष गजकुमार शहा, ललित शहा, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण शहा, कार्याध्यक्ष डॉ. पी.पी. शहा, श्रेणिक अन्नदाते, सचिव डॉ. महावीर उदगीरकर, सुरेश जैन, संजय चोरडिया, शिवाजी क्षीरसागर आदींची उपस्थिती होती. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेनशनाचे दीपप्रज्ज्वलन करून उद्घाटन झाले. पू. कनकमर मुनी यांनी औसा येथे निवासाला असताना लिहिलेल्या प्रसिद्ध ‘करकंडचरियू’ या ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शरदचंद्र गांधी म्हणाले, जैन समाज हा दाता समाज आहे. आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास अभ्यासला पाहिजे. भारतातील जैन समाजाचे स्थान हे एकूण लोकसंख्येच्या एक टक्केही नाही. परंतु जैनांनी समाजाला खूप दिले. पारशी समाजानंतर समाजाची सर्वाधिक काळजी जैन समाजाने वाहिली आहे. जैन समाजाने आता शाळा, रुग्णालयांच्या उभारणीकडे जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचा पू. विद्यानंद महाराजांचा संदेश अंमलात आणायची गरज असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्र जैन इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य गजकुमार शहा म्हणाले, जैन समाजाने व्यवहाराचा हिशोब व्यवस्थित लिहिला पण, समाजाचा इतिहास लिहिला नाही. याचे उत्तम उदाहरण शिकागोची धर्मपरिषद आहे. या परिषदेचे नाव जरी काढले तरी स्वामी विवेकानंद डोळ्यांसमोर येतात. परंतु याच परिषदेत बॅरिस्टर गांधी हे जैन धर्माचे साधक गेले होते. त्यांनी आपले ३० मिनिटांचे भाषण दिले. त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन अनेकांनी जैन धर्माचा अभ्यास केला हे माहीतच नाही. रोज म्हटल्या जाणाऱ्या णमोकार मंत्रांचे लेखक कोण हे अनेकांना माहीत नाही. त्यामुळे आपल्याच इतिहासाची नव्याने उजळणी करावी लागेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. संमेलनाध्यक्षांचे पॉवर पॉइंटद्वारे भाषण अधिवेशनाच्या अध्यक्षा सुजाता शास्त्री यांनी हिंदीतून भाषण केले. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जैन शिलालेखांचा पट मांडला. अशा अधिवेशन वा परिषदेत संमेलनाध्यक्षांचे मनोगत पॉवर पॉइंट प्रेझेंटशनद्वारे व्यक्त करून त्यांनी तंत्रज्ञानाचा नवा संदेश दिलाच, शिवाय देशभरातील जैन शिलालेखांचे जैन आणि मानवी प्रगतीला कसे पोषक आहे हे सांगून जैन शिलालेख हे समृद्ध जैन इतिहासाचे चिरंतन प्रतीक असल्याचे सांगितले.