शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

व्हिसासाठी सामाजिक न्याय मंत्र्यांची धावपळ

By admin | Updated: April 23, 2015 05:18 IST

लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या निवासस्थानाच्या खरेदीकरिता गुरुवारी दुपारी लंडनकडे रवाना होणारे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची

मुंबई : लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या निवासस्थानाच्या खरेदीकरिता गुरुवारी दुपारी लंडनकडे रवाना होणारे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची बुधवारी व्हिसा मिळवण्याकरिता धावपळ सुरू होती. बडोले यांचा विदेश दौरा पूर्वनियोजित असताना त्यांना व्हिसा मिळण्याकरिता अखेरच्या क्षणापर्यंत धडपड का करावी लागली, असा सवाल केला जात आहे.लंडन येथील डॉ. आंबेडकर यांचे निवासस्थान खरेदी करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या लंडन दौऱ्यात केली होती. याकरिता ४५ लाख रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली. सामाजिक न्यायमंत्री बडोले हे या खरेदी व्यवहाराकरिता रवाना होतील, असेही सरकारने आठ-दहा दिवसांपूर्वी जाहीर केले. त्यांच्या दौऱ्याकरिता सुमारे १५ लाख रुपयांची तरतूद केली. बडोले यांनी आपल्या लंडन भेटीची माहिती देण्याकरिता बुधवारी पत्रकार परिषद बोलावली होती. मात्र व्हिसा न आल्याने बडोले यांची व त्यांच्या कार्यालयाची धावपळ सुरु असल्याने पत्रकार परिषद रद्द केल्याचे समजते. याबाबत बडोले यांच्या खासगी सचिवांना विचारले असता त्यांच्या पत्रकार परिषदेचा निरोप आमच्याकडून दिला गेला नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र त्यांच्या कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बडोले यांनी गुरुवारी दुपारी व्हिसाकरिता बोटांचे ठसे देणे व अन्य प्रक्रिया पार पाडली. हा शासकीय दौरा असतानाही त्याकरिता लागणाऱ्या मान्यता मंगळवारी रात्री दिल्लीवरून प्राप्त झाल्या. त्यामुळे दौऱ्याची तयारी करायची की व्हिसाकरिता खेटे मारायचे, अशा कात्रीत बडोले सापडल्याचे समजते. याबाबत बडोले यांच्याशी सातत्याने संपर्क साधला असता ते बैठकीत असल्याचे सांगण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)