शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनामुळे सामाजिक सौख्य धोक्यात

By admin | Updated: July 1, 2016 02:24 IST

नाइटलाइफचा सर्वसामान्य मुंबईकरांना काहीच फायदा नाही.

मुंबई : नाइटलाइफचा सर्वसामान्य मुंबईकरांना काहीच फायदा नाही. नाइटलाइफ सुरू झाले तर येथील सामाजिक सौख्य धोक्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे मुंबईमधील व्यसनाच्या प्रमाणाचा विचार करता, आत्ताच पुरुषांमध्ये व्यसनाचे प्रमाण ६० टक्के आहे. महिलांमध्ये व्यसनाचे प्रमाण ३० टक्के आहे. नाइटलाइफ सुरू झाले, तर व्यसनाच्या प्रमाणात वाढ होईल, असे म्हणत महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी नाइटलाइफवर तोफ डागली.केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘मॉडेल शॉप्स अ‍ॅण्ड एस्टॅब्लिशमेंट्स’ कायद्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशभरातील विविध शहरांतील मॉल्स, दुकाने रात्रभर सुरू राहणार आहेत. या कायद्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना नाइटलाइफ अनुभवता येईल, असा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र हे साफ चुकीचे आहे, असे म्हणत वर्षा विद्या विलास यांनी सांगितले, नाइटलाइफ नक्की कोणासाठी आहे? याचा विचारच झालेला नाही. सर्वसामान्य मुंबईकर दिवसा कष्ट करून नाइट लाइफ कसा जगेल, हा प्रश्नच आहे. उलटपक्षी येथे नाइटलाइफ सुरू झाले, तर इथल्या पायाभूत सेवा-सुविधांवर ताण येईल. लोकल, बेस्ट बस, रिक्षा आणि टॅक्सी रात्रभर धावणार आहेत का, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही.१ लाख सीसीटीव्हींची गरजमुंबईत सुरक्षेसाठी येथे किमान नाइट व्हिजन असलेले १ लाख सीसीटीव्ही लावण्याची गरज आहे, तरच पोलीस नियंत्रण कक्षातून नियंत्रित ठेवू शकतात, अशी प्रतिक्रिया फायर अ‍ॅण्ड सिक्युरिटी असोसिएशन आॅफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद राव यांनी दिली.बंदोबस्तासाठी पोलीस सक्षमनाइटलाइफ सुरू झाल्यास आवश्यक बंदोबस्त पुरविण्यासाठी पोलीस सक्षम आहेत. जिथे बंदोबस्त लागेल तेथे पोलीस हजर राहतील. सुरक्षेत कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही. - अशोक दुधे, मुंबई पोलीस प्रवक्ते (पोलीस उपायुक्त) ‘कृष्णकृत्यांना वाव मिळणार’ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर म्हणाल्या, अंधारामध्ये ‘कृष्णकृत्ये’ होतात हे जगजाहीर आहे आणि त्याला वाव देणारा असा हा निर्णय आहे. पंतप्रधान योग किती महत्त्वाचा हे सांगतात, तर मुख्यमंत्र्यांवर संघाचा पगडा आहे. या निर्णयाचा परिणाम शरीर स्वास्थ्यावर, कौटुंबिक स्वास्थ्यावर किती होईल, याचा विचार केलेला दिसत नाही.