शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बांधिलकीचा हीरक महोत्सव

By admin | Updated: August 23, 2016 01:44 IST

लोकमान्य टिळकांच्या विचारधारेने प्रेरित होऊन १९५७ साली स्थापन झालेल्या जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा ६०वे वर्ष आहे.

रोहित गुरव,

मुंबई- लोकमान्य टिळकांच्या विचारधारेने प्रेरित होऊन १९५७ साली स्थापन झालेल्या जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा ६०वे वर्ष आहे. स्थापनेपासूनच हे मंडळ लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सवाचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. गणेशोत्सवादरम्यान सजावटीद्वारे दिला जाणारा सामाजिक संदेश आणि शिस्तबद्धता यामुळे मंडळाला विविध स्पर्धांमध्ये गौरविण्यात आले आहे.यंदा मंडळाचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने आगमनाला खास पारंपरिक ढोल पथकाला निमंत्रित केले आहे. भरगच्च कार्यक्रमांच्या आखणीत विभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहे.>मंडळाच्या शिरपेचात पारितोषिकाचा तुरादरवर्षी गणेशोत्सवादरम्यान देखाव्यातून विविध सामाजिक संदेश देऊन समाज प्रबोधनाचे कार्य केले जाते. गेल्या काही वर्षांत स्त्रीभ्रूणहत्या, पाणी वाचवा असे समाजोपयोगी संदेश देखाव्यातून देण्यात आले आहेत. २०१२ सालच्या ‘स्त्रीभ्रूणहत्या’ या मंडळाच्या देखाव्याला लोढा फाउंडेशन आयोजित स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. तसेच दादर पोलीस ठाणे अंतर्गत स्पर्धेत ‘शिस्तबद्ध मंडळा’चा मानही मिळाला आहे.>स्वच्छता अभियान : स्वच्छता अभियान संकल्पना घेऊन जनजागृती केली जाणार आहे. या संकल्पनेला धरून उत्सवादरम्यान देखावा सादर केला जाणार आहे. तसेच मंडपालगतच्या पदपथावरील कचरा साफ करून तेथे शालेय विद्यार्थ्यांसाठी बस थांबा शेड व वृत्तपत्र वाचनालय उभे करण्यात येणार आहे.>विविध स्पर्धांचे आयोजन शालेय विद्यार्थ्यांसाठी मंडळातर्फे निबंध, चित्रकला, स्मरणशक्ती, वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. तसेच महिलांमध्ये स्पर्धेदरम्यान पैठणी मिळविण्यासाठी चांगलीच चुरस रंगते.>विद्यार्थ्यांचा गुणगौरवविभागातील शालेय व महाविद्यालयांतील विशेष गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जातो. तसेच दहावी आणि बारावीतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.>लेजीमच्या तालावर बाप्पाचे आगमन विभागातील तरुणतरुणींनी सज्ज लेजीम पथकाच्या तालावर बाप्पाचे आगमन होते. सदरा-लेंगा व नऊवारी साड्या या पारंपरिक वेशात नटूनथटून विभागातील नागरिक आगमन सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.