शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

इव्हेंटीकरणाला बगल देत सामाजिक बांधिलकी

By admin | Updated: August 22, 2016 02:07 IST

गणेशोत्सवामागचा उद्देश परळ-भोईवाडा येथील ‘स्वातंत्र्यसैनिक सदानंद ढवण उद्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ आवर्जून जपत आहे

रोहित गुरव,

मुंबई- लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवामागचा उद्देश परळ-भोईवाडा येथील ‘स्वातंत्र्यसैनिक सदानंद ढवण उद्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ आवर्जून जपत आहे. स्पर्धा, इव्हेंटीकरण यांना बगल देत सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव साजरा करण्यावर या गणेश मंडळाचा भर असतो.‘भोईवाड्याचा विघ्नहर्ता’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंडळाची स्थापना १९४८ला झाली आहे. लहानमोठे कार्यकर्ते एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आजही हे मंडळ जपत आहे. देणगी, वर्गणी यामधून जमा होणाऱ्या पैशांचे काटेकोर नियोजन आखून जास्तीतजास्त सामाजिक सेवेवर खर्च करण्यावर मंडळाचा कल असतो. तसेच मूर्तीच्या स्पर्धेत न उतरता दरवर्षी ९ फुटांचीच बसलेली मूर्ती आणली जाते. अगदी साधेपणाने, पारंपरिक पद्धतीने व सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव साजरा केला जातो.गुणवंतांचा गौरव व ज्येष्ठांचा सत्कारशालेय व महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मंडळाच्या माध्यमातून सत्कार केला जातो. तसेच विभागातील गरजू विद्यार्थ्यांना मंडळ साह्य करते. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा गणेशोत्सवादरम्यान सत्कार केला जातो.उत्सवादरम्यान सामाजिक संदेश दरवर्षी गणेशोत्सवात एखादा सामाजिक संदेश देत समाजक्रांती घडविण्याचा मंडळाचा मानस असतो. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!’ लोकमान्य टिळकांच्या या सिंहगर्जनेला यंदा १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या वाक्याचा प्रसार यंदा गणेशोत्सवादरम्यान केला जाणार आहे. त्यासाठी टी-शर्ट्सवर या वाक्याचा उल्लेख केला जाणार आहे, विविध उपक्रमांद्वारे हे घोषवाक्य जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे, असे योगेश मोडक या मंडळाच्या कार्यकर्त्याने सांगितले.