शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून ‘भारत माता की जय’ म्हणतात - सरसंघचालक

By admin | Updated: June 9, 2016 22:00 IST

जगातील अनेक देशांना पितृत्वाच्या नजरेने तेथील लोक पाहतात. परंतु आपल्या देशात लोक देशाच्या भूमीला सर्वस्व मानतात. देश आणि जनता यांच्यात सूत्ररुप भावना असते. नियम कुठेही नाही.

ऑनलाइन लोकमत

नागपूर दि. ९ : जगातील अनेक देशांना पितृत्वाच्या नजरेने तेथील लोक पाहतात. परंतु आपल्या देशात लोक देशाच्या भूमीला सर्वस्व मानतात. देश आणि जनता यांच्यात सूत्ररुप भावना असते. नियम कुठेही नाही. पण लोक देशाला मातृस्थानी मानतात. मातृत्वाची ही भावना देशासोबत लोकांना एकत्र जोडते व यातूनच ‘भारत माता की जय’ असे म्हटल्या जाते, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले. संघ कुणाचा विरोध करत नाही. तसेच कुणाला प्रतिक्रिया म्हणूनदेखील संघ काम करत नाही. हिंदुत्व धर्म नव्हे तर संस्कृतीशी निगडीत आहे. म्हणूनच सर्व धर्माचे लोक येथे राहत असले तरी हा हिंदूंचा देश म्हटल्या जातो. समाजात एकात्मता वाढवून शोषणुक्त समाजाची निर्मिती करणे आवश्यक आहे, असेदेखील ते म्हणाले.

देशाचा विकास हे प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजे. परंतु अनेकदा पात्रता नसलेल्या लहान लोकांचा अनावश्यक विरोध करण्यात येतो. या विरोधातूनच ते मोठे होतात. त्यामुळे टीका करणाºयांकडे दुर्लक्ष करायला हवे. गरजणारे कधीच बरसत नाही, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी संघ परिवारातील संस्थांना अशा वादांच्या वेळी शांत राहण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला. दादरी वाद, ‘जेएनयू’प्रकरण, कन्हैय्या वाद इत्यादींमध्ये संघ परिवारातील संस्थांकडून विरोध व प्रतिक्रिया देण्यात आली होती व प्रत्येक प्रकरणाची देशस्तरावर पेटले. यासंबंधात सरसंघचालकांनी परिवारातीलच संस्थांचे आपल्या भाषणातून कान टोचले.

संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचा गुरुवारी सायंकाळी रेशीमबाग मैदान येथे समारोप झाला. याप्रसंगी कोलकाता येथील सुप्रसिद्ध स्तंभलेखक रंतिदेव सेनगुप्ता हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. देशासमोर आजच्या घडीला अनेक समस्या आहेत. या समस्यांवर चर्चा करण्यापेक्षा त्यांचे उपाय शोधण्याची आवश्यकता आहे. काही जणांकडून विरोध होतो व ते कार्य करण्यापेक्षा जोरजोराने बोलण्यातच धन्यता मानतात. अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे हिताचे असते. देशातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात देशाबाबत प्रेम निर्माण करणे आवश्यक आहे. जोपर्यंत ही भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. शासनाच्या भरवशावर राहण्यापेक्षा समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सामान्य मनुष्याला प्रशिक्षित करण्याची आवश्यकता आहे. लोकशक्तीच्या जागरणासाठी देशाच्या मूल्यांचे पुनर्जागरण करावे लागेल, असे डॉ.भागवत म्हणाले. 

चीन व पाकिस्तानपासून देशाला धोका आहे.या राष्ट्रविरोधी शक्तींना आता सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली आहे. राष्ट्रभक्तींचा हुंकार देशभरात गुंजलाच पाहिजे, असे मत रंतिदेव सेनगुप्ता यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर वर्गाचे सर्वाधिकारी एन.वन्नीराजन, महानगर संघचालक राजेश लोया हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यंदाचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग १६ मे पासून सुरू झाला. या वर्गात देशभरातून १८ ते ४० वर्षे वयोगटातील ९७८ स्वयंसेवक सहभागी झाले होते. या स्वयंसेवकांनी सुरुवातीला दंड, नियुद्ध, योगासन इत्यादींची विविध शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली. यानंतर घोष प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. वर्गकार्यवाह हरीष कुळकर्णी यांनी प्रास्ताविकात वर्गाबाबत माहिती दिली.

पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे कौतुक

जगात भारताची प्रतिष्ठा वाढत आहे. अमेरिकेच्या सिनेटमध्ये पंतप्रधानांनी सुंदर भाषण केले. लोक स्विकार करतील अशा शैलीत ते मुद्देसूद भाषण करतात. विशेष म्हणजे परखड मतदेखील व्यक्त करतात. अमेरिकेत असल्यामुळे तेथील लोक व विचारांचे महिमामंडन त्यांनी केले. परंतु अनावश्यक स्तुती मात्र टाळली, या शब्दांत सरसंघचालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.