शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

....म्हणून संतप्त नागरिकांनी लाईनमनचे अपहरण करुन बांधले

By admin | Updated: August 21, 2016 12:08 IST

समांतर जलवाहिनी कंपनीच्या दोन लाईनमनचे अपहरण करून चक्क वसाहतीत एक तास बांधून ठेवले. या घटनेमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. २१ : न्यू नंदनवन कॉलनी परिसरातील भूजबळनगर व परिसरातील वसाहतींना गुरूवारी पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे या भागातील एका नगरसेविकेच्या पी.ए.ने समांतर जलवाहिनी कंपनीच्या दोन लाईनमनचे अपहरण करून चक्क वसाहतीत एक तास बांधून ठेवले. या घटनेमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

भूजबळनगर आणि परिसरातील वसाहतींना ज्युबलीपार्क येथील पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा होतो. गुरूवारी पाणीपुरवठ्याचा दिवस होता. मात्र वसाहतींना पाणी मिळाले नाही. फारोळा येथून अत्यंत कमी दाबाने ज्युब्लीपार्कला पाणी आले. टाकीची लेव्हलपण कमी होती. त्यामुळे भूजबळनगरला पाणीपुरवठा होवू शकला नाही.

शनिवारी परत पाण्याचा दिवस होता. ज्यावेळी पाणी यायला हवे होते त्यावेळी आले नाही. त्यामुळे या वॉर्डातील नगरसेविकेच्या स्वीय साह्यकाने दुपारी २ वाजता थेट ज्युब्लिपार्क पाण्याची टाकी गाठली. टाकीवर शेख वसीम आणि सचिन वाणी हे दोन लाईनम सापडले. दोघांना स्वीय साह्याने पकडून नेले. थेट भूजबळनगर येथे नेवून एका विजेच्या खांबाला दोघांना बांधून टाकले. दोघांना बेदम मारहाण करण्याचा दमही भरण्यात आला. एक तास दोन्ही लाईनमनला बांधून ठेवले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

सायंकाळी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीचे अधिकारी स्वामी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघा लाईनमची साधी विचारपूसही केली नाही. या घटनेमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गुरूवारी पाणीपुरवठा न झाल्याने भूजबळनगर भागातील नागरिकांनी व नगरसेविकेने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला होता. कंपनीचा एकही अधिकारी उपलब्ध न झाल्याने राग अनावर झाला होता. मागील दोन महिन्यांपासून शहरतील अनेक वसाहतींमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नगरसेवकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन लावला तर एकही अधिकारी फोन उचलत नाही.