शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

डास पळवणारी अगरबत्ती घातकच!

By admin | Updated: March 30, 2015 02:26 IST

डास पळवणारी एक अगरबत्ती रात्रभर सुरू राहिल्यास ती १०० सिगारेटचा धूर सोडते, हे सीआरएफ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे

सुमेध वाघमारे,  नागपूरडास पळवणारी एक अगरबत्ती रात्रभर सुरू राहिल्यास ती १०० सिगारेटचा धूर सोडते, हे सीआरएफ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. हा धूर ‘क्रॉनिक आॅब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मनरी डिसीज’साठी (सीओपीडी) कारणीभूत ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. फुफ्फुसांच्या या व्याधीचे प्रमाण जगभरात वाढत आहे. भारतात सुमारे १५ दशलक्ष व्यक्ती या व्याधीने ग्रस्त आहेत. सुरुवातीला या आजाराची फारशी लक्षणे दिसून येत नाही. यामुळे बहुसंख्य रुग्ण तिसऱ्या टप्प्यात उपचारासाठी येतात, परिणामी युरोपच्या तुलनेत भारतात सीओपीडीचे चारपट जास्त मृत्यू होतात. धक्कादायक म्हणजे, यात धूम्रपान न करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सीओपीडीबद्दलचे अज्ञान मृत्यूला कारणीभूत असलेले हे तिसरे मोठे कारण ठरत आहे. तंबाखूचा धूर, बायोमास इंधनाचा धूर, औद्योगिक प्रदूषण, वाफा आणि पर्यावरणीय प्रदूषके या कारणांमुळे ‘सीओपीडी’ हा आजार बळावत आहे. सीओपीडीची सुरुवातीची लक्षणे न जाणारा कफ, कफाचे बेडके आणि व्यायाम करताना किंवा पायऱ्या चढताना श्वास घेण्यात होणारा त्रास, अशी आहेत. परंतु अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात.नंतर जेव्हा आजार वाढतो पायऱ्या चढायला, फिरायला जाताना किंवा सकाळच्यावेळी आंघोळ करताना, कपडे घालताना श्वास घेण्यास अडचण जाणवू लागते तेव्हा रुग्ण उपचारासाठी डॉक्टरांकडे येतात. मात्र तोपर्यंत रुग्ण तिसऱ्या टप्प्यात गेलेला असतो. अशा रुग्णांची संख्या ९० टक्के आहे. या आजाराच्या रुग्णाला फार लवकर मधुमेह, उच्चरक्तदाब, अर्धांगवायू, ओस्टिओपोरीसीस सारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे या आजाराचे निदान जितक्या लवकर होईल, तितक्याच प्रभावीपणे हा उपचार करणे शक्य आहे. विशेष म्हणजे, अवघ्या सहा सेकंदांच्या तपासणीतून याचे निदान होते.