शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट कार्डचा फंडा - अनेकांना गंडा

By admin | Updated: January 25, 2015 00:55 IST

स्मार्ट कार्डच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास घसघशीत लाभ मिळेल, असे आमिष दाखवून काटोल मार्गावर राहणाऱ्या अय्यर बंधूंनी अनेकांना कोट्यवधींचा चुना लावला.

फसवणूक : अय्यर बंधंूविरुद्ध गुन्हे दाखल नागपूर : स्मार्ट कार्डच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास घसघशीत लाभ मिळेल, असे आमिष दाखवून काटोल मार्गावर राहणाऱ्या अय्यर बंधूंनी अनेकांना कोट्यवधींचा चुना लावला. रवी जनार्धन अय्यर (रा. ग्रीनव्हॅली अपार्टमेंट, दुसरा माळा, काटोल रोड) आणि हरी जनार्दन अय्यर (रा. नेताजी सोसायटी, काटोल रोड) अशी आरोपींची नावे असून, अंबाझरी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी अय्यर बंधूंचे धरमपेठेतील मनोरमा बिल्डिंगमध्ये तिसऱ्या माळ्यावर कार्यालय आहे. आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत आरोपी नागरिकांना फोन करून, वेगवेगळे आमिष दाखवून कार्यालयात बोलवून घ्यायचे. येथे आलेल्यांना ते लॅपटॉपवर प्रेझेंटेशन दाखवायचे. आम्ही झारखंडला जयमस इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस प्रा. लि. नामक कंपनी सुरू केली असून, आपल्या कंपनीला प्रादेशिक परिवहन विभागाला स्मार्ट कार्ड पुरविण्याचे कंत्राट मिळाले आहे. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास व्याजाच्या रूपाने घसघशीत लाभ मिळेल, असे तो सांगत होता. त्याने दाखविलेल्या आमिषाला बळी पडून अनेकांनी त्याच्याकडे कोट्यवधींची गुंतवणूक केली. अशाच प्रकारे गोकुळपेठेतील व्यावसायिक सुरेंद्र गयाप्रसाद शर्मा (वय ४७) आणि अन्य काही जणांनी ५ जून २०११ ते १० सप्टेंबर २०१२ या कालावधीत अय्यर बंधूंकडे गुंतवणूक केली. प्रारंभी त्याने अनेकांना व्याज म्हणून थोडी थोडी रक्कम दिली. नंतर मात्र टाळाटाळ सुरू केली. पैशासाठी लोकांचा तगादा वाढल्यामुळे आरोपी अय्यर बंधूंनी आपले कार्यालय बंद करून पळ काढला. त्यामुळे शर्मा आणि अन्य काही गुंतवणूकदार बुधवारी अंबाझरी ठाण्यात पोहचले. पोलिसांनी उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे अय्यर बंधूंनी ५९ लाख, ७५ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)प्रकरण गुन्हेशाखेकडे आरोपींनी अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची माहिती मिळाल्यामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हेशाखेकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यामुळे आता गुन्हेशाखेच्या आर्थिक विभागाचे पोलीस अय्यर बंधूंचा शोध घेत आहेत.