शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबचतीसाठी छोटे; पण प्रभावी उपाय

By admin | Updated: May 18, 2016 05:17 IST

लोकमत’च्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन पाणी वाचविण्यासाठी राज्यभरातील घराघरांमध्ये आता छोट्या-छोट्या; पण प्रभावी उपाययोजना सुरू झाल्या आहेत.

मुंबई : ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन पाणी वाचविण्यासाठी राज्यभरातील घराघरांमध्ये आता छोट्या-छोट्या; पण प्रभावी उपाययोजना सुरू झाल्या आहेत. नागरिक आता उत्स्फूर्तपणे या उपायांची माहिती आपल्या परिसरातील रहिवाशांना सांगताना दिसून येत आहेत.कोल्हापुरातील बेलबाग (मंगळवार पेठ) येथील सुलोचना आदिनाथ जाधव यांनी संक्रांतीतील सुगडींचा (खण) वापर करून त्यांनी ठिबक पद्धतीने पाणी देऊन झाडे जगविली आहेत. त्यांचा हा प्रयत्न छोटासा असला, तरी सहजपणे पाणी बचत करण्याचा संदेश देणारा आहे. शांतिनिकेतन अपार्टमेंटमधील पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या जाधव यांनी त्यांच्या फ्लॅटच्या प्रवेशद्वार, खिडक्यांमध्ये गोकर्ण, वड, लिंबू, ब्रह्मकमळ, कढीपत्ता, बेल, तुळस अशी विविध स्वरूपातील २0 झाडे कुंड्यांमध्ये लावली आहेत. या झाडांना पाणी देण्यासाठी प्रत्येक कुंडीमध्ये त्यांनी एक सुगडी ठेवून त्याला छोटे छिद्र पाडले आहे. एका सुगडीतील पाणी दिवसभर झाडांना पुरते. यासाठी त्या देवपूजेचे पाणी वापरतात. सुगडींचा वापर न केल्यास, या झाडांसाठी साधारणत: एक मोठी बादली पाणी द्यावे लागले असते, पण सुगडींचा वापर केल्याने दोन-तीन तांब्या पाणी पुरेसे होत आहे. गेल्या चार वर्षांपासून त्या पाणीबचतीचा अशा स्वरूपातील प्रयत्न करीत आहेत.सोलापुरातील होटगी रस्त्यावर राहणारे बी. एन. वेल्हाळ यांनी जलबचतीसाठी व्यक्तिगत प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘जलमित्र अभियानासंदर्भात ‘लोकमत’कडून विविध उपक्रम घेतले जात आहेत. त्या संदर्भातील वृत्त वाचून मी स्वत: पाणी वाचविण्यासाठी जनजागरण करीत आहे.’ सोलापुरात पाच दिवसांतून एकदा पाणी येते. पाणी आल्यानंतर शिळे झालेले पाणी ओतून देण्याकडे महिलांचा कल असतो. या वेळी वेल्हाळ हे आपल्या परिसरात फिरून पाणी न ओतण्याबाबत आवाहन करतात. स्वत:च्या घरातील चार-पाच दिवसांपूर्वीचे पाणी ते परात आणि पसरट भांड्यांमध्ये एकत्र करून पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी घराच्या गच्चीवर किंवा अंगणात ठेवतात. भवानी पेठेतील सुलक्षणा पाटील यांनी ‘लोकमत’ला दूरध्वनीवरून सांगितले की, ‘आम्ही स्टीलचे ताट-वाटी न वापरता, ‘यूज अँड थ्रो’ पत्रावळ्यांचा वापर करीत आहोत,’ असे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)