शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी होणार जमीनदोस्त

By admin | Updated: March 6, 2017 03:01 IST

खांदा वसाहतीमधील झोपडपट्टीतील जागा रिकामी करण्याची नोटीस सिडकोने शुक्रवारी येथील रहिवाशांना बजावली आहे.

पनवेल : खांदा वसाहतीमधील झोपडपट्टीतील जागा रिकामी करण्याची नोटीस सिडकोने शुक्रवारी येथील रहिवाशांना बजावली आहे. बेकायदा उभारलेल्या झोपडपट्ट्या जमीनदोस्त करण्याची मोहीम सिडकोने हाती घेतली असून, ९ ते १३ मार्चपर्यंत सिडको कारवाई करणार आहे, अशी माहिती सिडकोचे अतिरिक्त जिल्हाधिकारी एस. एस. पाटील यांनी दिली आहे. साडेसतरा एकर जागेवर झोपडपट्टी पसरली असून त्या चार भूखंडांची आजच्या बाजारभावाप्रमाणे ४०० कोटींपेक्षा जास्त किंमत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने ५ जानेवारी रोजी वृत्तही प्रसिद्ध केले आहे. खांदा कॉलनी आणि नवीन पनवेल, कामोठे, खारघर, कळंबोली, तळोजे परिसरातील बेकायदा झोपडपट्टी हटविण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. याशिवाय त्याचा पाठपुरावाही केला होता. सरकारची सुमारे ४०० कोटींची जागा झोपडपट्टीच्या आडून गिळंकृत करण्यात येत असल्याची तक्रारही सिडकोसह महानगरपालिकेकडे केली होती. पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण देत सिडकोच्या वतीने ही कारवाई पुढे ढकलली जात होती. पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना भेटूनही झोपडपट्टी हटविण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. या वेळी डॉ. शिंदे यांनी सिडको अधिकाऱ्यांना प्राधान्याने ती मोहीम हाती घेण्यास सांगितले आहे. त्या झोपडपट्टीमधून होणारे गैरव्यवसाय सामाजिक आरोग्य बिघडवत असल्याने खांदा वसाहतीतील नागरिकांची तक्र ार होती. या झोपडपट्टीवाढीमागे राजकीय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा अनेक वर्षे रंगत आहे. पोलीस बंदोबस्ताचा मुद्दा सिडकोने पुढे केल्यानंतर सिडकोचे अप्पर पोलीस महासंचालक विनय कोरगांवकर, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त तुषार दोषी, परिमंडळ-२चे पोलीस उपायुक्त डॉ. राजेंद माने आदींची सामाजिक कार्यकर्ती रूपा सिन्हा, कांतीलाल कडू, विजय काळे, संतोषी मोरे, जयंत भगत, अ‍ॅड. किरण घरत, माजी नगरसेवक शिवाजीराव थोरवे, राहुल रोटे यांनी बैठका घेऊन सिडको कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त पुरविण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्त आणि लागणारे कवच देण्याची तयारी दर्शविली आहे. तसे निर्देश पोलीस उपायुक्तांनी तत्काळ खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज छापरिया यांना दिली आहे. त्यामुळे लवकरच खांदा वसाहती झोपडपट्टीमुक्त होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)अभिनायानाला हातभारसिडको अतिक्र मण विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी एस. एस. पाटील, विभागीय कार्यकारी अभियंता दीपक जोगी, राठोड आदींनी खांदा कॉलनीतील बांधकाम पाडण्यासाठी अखेर मोहीम हाती घेतली असून त्याकरिता झोपडपट्टी काढून टाकण्यासाठी संबंधितांना नोटीस बजावली आहे. सिडकोच्या मालकीच्या सेक्टर ७, ९, ११ आणि १३मध्ये जवळपास ४०० कोटी रूपये किमतीच्या भूखंडांवर अतिक्र मण केलेले आहे. ती अतिक्र मणे काढून टाकल्यास गैरधंद्यांना आळा बसेलच, शिवाय केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाला मोठा हातभार लागणार आहे.