शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा महामार्गावरील वृक्षाची कत्तल

By admin | Updated: July 20, 2016 15:32 IST

१ ते ७ जुलै दरम्यान महाराष्ट्र शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला . त्या अनुषंगाने जनमानसात वृक्षलागवडीबद्दल जनजागृती होणे तसेच त्यांना प्रेरणा मिळावी

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 20 -  १ ते ७ जुलै दरम्यान महाराष्ट्र शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला . त्या अनुषंगाने जनमानसात वृक्षलागवडीबद्दल जनजागृती होणे तसेच त्यांना प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून वृक्ष दिंडी काढल्यात. अख्खे प्रशासनाने पुढाकार घेतला, पण भरदिवसा अकोला महामार्गावर होत असलेल्या वृक्षाची कत्तल होत असतांना याची कोणालाही कल्पना नसल्याची घटना २० जुलै रोजी दुपारी २ वाजता घडली. एका सुज्ञ नागरिकाने सामाजिक वनिकरण विभाग, वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क केला तेव्हा हे कार्यक्षेत्र आमच्याकडे येत नाही असे सांगून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे बोट दाखविले.२० जुलै रोजी अतिशय रहदारीचा असलेला वाशिम - अकोला महामार्गावरील वृक्षाची कत्तल होतांना एका सुज्ञ नागरिकाने याबाबत सामाजिक वनीकरण विभागाच्या राठोड, वनविभागाचे वनअधिकारी नांदुरकर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए.व्ही.चेके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर वृक्ष असून ते आमच्या अखत्यारितील विषय नसल्याचे सांगितले. परंतु वृक्ष वाचविण्यासाठी कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. या घटनेवरुन शासनाच्यावतिने दोन कोटी वृक्ष लागवडीचा केलेला संकल्पानुसार लावण्यात येत असलेले वृक्ष टिकून राहण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.