शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या अपघाती मृत्यूबद्दल वृद्ध पालकांच्या भरपाईला कात्री

By admin | Updated: November 10, 2015 02:10 IST

भिवंडीजवळील कोन गावातील एका वृद्ध दाम्पत्यास त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या अपघाती मृत्यूबद्दल ठाण्याच्या मोटार अपघात भरपाई दावा न्यायाधिकरणाने मंजूर

मुंबई : भिवंडीजवळील कोन गावातील एका वृद्ध दाम्पत्यास त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या अपघाती मृत्यूबद्दल ठाण्याच्या मोटार अपघात भरपाई दावा न्यायाधिकरणाने मंजूर केलेल्या भरपाईत उच्च न्यायालयाने अपिलात ३५ लाखांची कपात करून या दाम्पत्यास २६ लाख ४५ हजार रुपयांची सुधारित भरपाई मंजूर केली आहे.न्यायाधिकरणाने मयताचे अपघताच्या वेळचे वय आणि त्याचे भविष्यातील संभाव्य उत्पन्न यांच्या गुणोत्तरावर भरपाईची रक्कम ठरवून चूक केली. त्याऐवजी मयतच्या पालकांचे अपघाताच्या वेळचे वय गृहीत धरून भरपाई काढायला हवी होेती, असे नमूद करून न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने भरपाईचा फेरहिशेब केला. न्यायाधिकरणाने ६१ लाख ५५ हजार भरपाई मंजूर केली होती. उच्च न्यायालयाने ती कमी करून २६ लाख ४५ हजार रुपये केली.ज्या ट्रकने बसला जोरदार धडक दिल्याने या दाम्पत्याच्या मुलाचा मृत्यू झाला होता तो ट्रक अजमेर येथील कमरुद्दीन एस. खान यांच्या मालकीचा होता. भरपाई दाव्यात ट्रकचालक हजर न झाल्याने ट्रकचा विमा उतरविणाऱ्या न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीनेच दाव्यात प्रतिवाद केला होता. विमा कंपनीनेच केलेले अपील मंजूर करून उच्च न्यायालयाने भरपाईची रक्कम कमी केली. भरपाईच्या या रकमेवर दावा दाखल केल्यापासून म्हणजे २००९ पासून ९ टक्के दराने व्याजही द्यावे लागेल. भरपाईपैकी काही रक्कम या दाम्पत्यास रोख मिळेल व बाकीची रक्कम त्यांच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवली जाईल. रामराव लाला बोरसे व सुशिला असे या दाम्पत्याचे नाव आहे. ते कल्याण-भिवंडी रस्त्यावरील कोन गावात नाईकवाडीत राहतात. गावातील काही मंडळींसोबत त्यांच्या २९ वर्षांचा मुलगा खासगी बसने एका लग्नासाठी अमळनेर येथे गेला होता. तेथून परत येत असताना १९ फेब्रुवारी २००६ रोजी समोरून भरधाव आलेल्या ट्रकने धडक दिली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्या दीपकचे नंतर नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निधन झाले होते. दीपक भिवंडी येथे शिशुविहार एज्यु. सोसायटीतर्फे दादासाहेब दांडेकर विद्यालयात इंग्रजीचा शिक्षक म्हणून हंगामी नोकरीस होता. अकाली मृत्यू झाला नसता तर दीपक नोकरीत कायम झाला असता व त्याला सहाव्या वेतन आयोगानुसार दरमहा ४० हजार रुपये पगार मिळाला असता. कायद्यानुसार या हिशेबाने मिळणारे ५० टक्के भावी उत्पन्न खंडपीठाने भरपाईसाठी गृहित धरले. तसेच मुलाच्या अपघाती मृत्यूच्या वेळी आई-वडिलांचे सरकारी वय ६१ वर्षे होते. म्हणजेच किमान सात वर्षे त्यांना मुलाचा आधार मिळाला असे मानून ५० टक्के भावी उत्पन्नाला सातने गुणून भरपाईची रक्कम ठरविली. न्यायाधिकरणाने दीपकचे वय हा आधार मानला होता व तो आणखी १७ वर्षे नोकरी करू शकला असता असे गृहित धरून १७ने गुणून भरपाई ठरविली होती. (विशेष प्रतिनिधी)