शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्केटिंगचा २७ तासांचा विक्रम

By admin | Updated: December 12, 2014 00:38 IST

बापूजी साळुंखे स्कूलचे खेळाडू : इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड व आशिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली नोंद

कोल्हापूर : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग रिंगवर शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग स्कूलच्यावतीने सलग २७ तास स्केटिंग करण्याच्या नवा विक्रम आज, गुरुवारी सकाळी पावणेबारा वाजता नोंदवला. या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड’ व ‘आशिया बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये घेतली. या उपक्रमात ५२ खेळाडूंनी सहभाग घेतला. सलग २४ तास स्केटिंग करण्याचा यापूर्वीचा विक्रम बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी जून २०१४ मध्ये इंडिया बुक व आशिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंदवला होता. हा २४ तासांचा विक्रम आज बापूजी साळुंखे स्केटिंग स्कूलच्या ५२ खेळाडूंनी मोडला. काल, बुधवारी सकाळी पावणेआठ वाजता या उपक्रमास सुरुवात केली, तर आज सकाळी पावणेबारा वाजता २७ तास स्केटिंग करत पूर्ण झाल्यानंतर बेळगाव येथे स्थापण्यात आलेला विक्रम मोडल्याची घोषणा इंडिया बुक व आशिया बुक आॅफ रेकॉर्डचे अ‍ॅडजेडीक्युटर मनमोहन रावत यांनी जाहीर केला. हा विक्रम नोंदवण्यासाठी अमॅच्युअर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनचे सहकार्य लाभले. विक्रमाची नोंद झाल्यानंतर प्राचार्य अभयकुमार साळुंखे, अ‍ॅड. धनंजय पठाडे, पंचगंगा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष राजाराम शिपुगडे यांच्या हस्ते सहभागी खेळाडूंचा सत्कार केला. यावेळी प्रशिक्षक महेश कदम, रामचंद्र पाटील, पालक उपस्थित होते. या उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू असे -प्रतीक पाटील, शुभम पाटील, श्रृती माने, किरण हराळे, अमेय पाटील, सोहम काटकर, आर्या ढवळे, आयुष उबराणी, मेधा भिलवडे, सिद्धेश देवळेकर, धुर्वी मेहता, अभिराम अकेला, इशा देसाई, सुजल पाटील, अनिकेत मेंगाणे, शुभम मोहिते, सर्वेश भिके, आयुष बिडकर, सुयश माने, ओम जगताप, प्रेरणा भोसले, श्रेयश कागले, शिवानी परीट, शिवम परीट, ऐश्वर्या बिरजे, हर्षवर्धन सूर्यवंशी, चंदन चव्हाण, चंद्रप्रभू मोळेकर, धनश्री कदम, श्रृती आणवेकर, तेजस्विनी कदम, मोरेश्वर कदम, विजया पाटील, अभिजित पाटील, ओंकार मोहिते, आकांक्षा मगर, शिवानी प्रभावळे, श्रेयश कागले, हृषिकेश आडके, सोमनशा: शिपुगडे, खुशी संघवी, अली रिकबदार, इरा वेंगुर्लेकर, अक्षरा खाबिया, तवीश दलाल, खुशी पाटील, वीरश्री कदम, सार्थक वणकुद्रे, सोहम काकडे, वर्धन ढवळे, वेदांत उबाळे, दीप जोसेफ, वर्धन देसाई. कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग स्कूलच्या खेळाडूंनी सलग २७ तास स्केटिंग करण्याचा नवा विक्रम केला. इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड व आशिया बुक आॅफ रेकॉर्डच्यावतीने यामध्ये सहभागी खेळाडूंना सन्मानपदक व प्रमाणपत्र बहाल केले. यावेळी बुकचे मनमोहन रावत, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, अ‍ॅड. धनंजय पठाडे, राजाराम शिपुगडे, महेश कदम, रामचंद्र पाटील, आदी उपस्थित होते.