शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सहावीच्या मुलीने प्रियकराला पळविले!

By admin | Updated: January 12, 2015 04:09 IST

प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवित पळवून नेण्याच्या घटना नव्या नाहीत, मात्र सहावीतील विद्यार्थिनीने चक्क प्रियकराला लग्नाचे आमिष दाखवून दिल्लीतून येथे पळवून आणले

जळगाव : प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवित पळवून नेण्याच्या घटना नव्या नाहीत, मात्र सहावीतील विद्यार्थिनीने चक्क प्रियकराला लग्नाचे आमिष दाखवून दिल्लीतून येथे पळवून आणले. पोलिसांनी या प्रेमीयुगुलास ताब्यात घेतले आहे.दिल्लीतील सुभाषनगरच्या खयाल भागात वडिलांसह राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीचे काही दिवसांपूर्वी शेजारील रिक्षाचालक अमरचंद्र कुमार याच्यावर प्रेम जडले. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याची कुणकुण मुलीच्या आईला लागली. आपले कुटुंबीय प्रेमाला विरोध करतील या भीतीने अल्पवयीन मुलीनेच तरुणाला लग्नाची मागणी घातली. सुरुवातीला नकार देणाऱ्या अमरचंद्र कुमारने नंतर लग्नास होकार दिला. अंगावरच्या कपड्यांवरच त्यांनी दिल्ली सोडली. २ जानेवारीला हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसने त्यांनी जळगाव गाठले.त्यांनी येथील एका मंदिरात लग्न केले. अमरचंद्र कुमारने सुप्रीम कॉलनीत भाड्याची खोली घेत रोजगाराची शोधाशोध सुरू केली. औद्योगिक वसाहतीमधील एका चटईच्या कंपनीत तो कामाला लागला. तिकडे दिल्लीत मुलगी घरातून पळून गेल्यानंतर अस्वस्थ झालेल्या तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. दिल्ली पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन तपासल्यानंतर दोघे जळगावात असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर मुलीचे वडील जळगावला आले. रविवारी मुलीच्या वडिलांनी जळगावला दोघांचा शोध घेतला. त्यानंतर औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक आर. टी. धारबडे यांच्या मदतीने त्यांनी दोघांना पोलीस स्टेशनला आणले. मात्र संबंधित मुलीने आपण लग्न केल्याचे सांगत वडिलांसोबत जाण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)