शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सराफा व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या सहा जणांवर मोक्का

By admin | Updated: August 22, 2016 02:42 IST

सराफ व्यावसायिकाचे अपहरण करून लाखोची खंडणी मागणाऱ्या सहा जणांच्या टोळीला खारघर पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत अटक केली

पनवेल : सराफ व्यावसायिकाचे अपहरण करून लाखोची खंडणी मागणाऱ्या सहा जणांच्या टोळीला खारघर पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत अटक केली आहे. या सर्वांना अलिबाग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे सर्व आरोपी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील आहेत. सांगलीतील एका व्यक्तीचा अहमदाबाद येथे सराफाचा व्यवसाय होता. मार्च महिन्यात ते खारघरमध्ये व्यवसायानिमित्त आले असता त्यांची ओळख खारघरमधील एका ज्वेलर्सबरोबर झाली. ते दोघेही रात्री एका लग्नाच्या कार्यक्र मासाठी जात असताना, मोटारकारमधून आलेल्या आठ ते नऊ व्यक्तीच्या टोळीने या दोघांचे अपहरण करून अकरा लाखांची मागणी केली. पोलीस मागावर असल्याची माहिती मिळताच या टोळीने या दोघांना इंदापूर येथे सोडून पळ काढला. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांच्या पथकाने या टोळीतील सुभाष नामदेव माने, नितीन बापू कदम, तेजस दादासाहेब पाटील, अरविंद प्रताप पवार, अमोल शिवाजी माने, संदीप राजाराम भोसले यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता या टोळीने सोलापूर, पुणे व इतर भागातून काहींचे अपहरण करून खंडणी मागितल्याचे प्रकार उघडकीस आल्याने या सहा व्यक्तींच्या विरोधात संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत अटक केली आहे. (प्रतिनिधी)>खंडणीचे गुन्हे उघडसुभाष नामदेव माने, नितीन बापू कदम, तेजस दादासाहेब पाटील, अरविंद प्रताप पवार,अमोल शिवाजी माने, संदीप राजाराम भोसले यांना ताब्यात घेवून चौकशीया टोळीने सोलापूर, पुणे व इतर भागातून काहींचे अपहरण करून खंडणी मागितल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. पोलिसांनी शिताफीने तपास करून या टोळीचा पर्दाफाश केला. त्यांना जेरबंद केले. न्यायालयाने त्यांना २६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.