शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सहाऐवजी आठ तासांची शाळा!

By admin | Updated: November 15, 2015 02:10 IST

विद्यार्थ्यांमध्ये चांगली आकलन क्षमता निर्माण करण्यासाठी शाळा सहाऐवजी आठ तास करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे

पुणे : विद्यार्थ्यांमध्ये चांगली आकलन क्षमता निर्माण करण्यासाठी शाळा सहाऐवजी आठ तास करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचा कालावधी सहावरून आठ तास केल्यास त्यांची आकलन क्षमता चांगली होईल, असा दावा शालेय विभागाने केला आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या महाराष्ट्रासंदर्भातील संकेतस्थळावर जाहीर केलेल्या अहवालात वेळ वाढविण्याची बाब शालेय विभागाने अधोरेखित केली आहे.गेल्या काही दिवसांपासून केंद्र शासनाच्या माध्यमातून नवीन राष्ट्रीय धोरण राबविण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारने १४ शैक्षणिक बाबी घेऊन त्यावर आधारित विविध प्रश्नांवर गाव, तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर चर्चा घेऊन त्यासंबंधीचा अहवाल आॅनलाइन सादर करण्याचे राज्य सरकारला आदेश दिलेले होते. त्यानुसार हा प्रस्ताव राज्याच्या शालेय विभागाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आला आहे. या अहवालामध्ये १४ शैक्षणिक बाबींची मुद्देसुद मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठीच्या शिफारशी सुचिवण्यात आल्या आहेत.अहवालानुसार विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेच्या वृद्धीसाठी व विकासासाठी शाळा या सहाऐवजी आठ तासांच्या कराव्यात असा मुद्दा मांडण्यात आला आहे. विविध अहवालांच्या आधारे शालेय विभागाने हा प्रस्ताव सादर केल्याचे अहवालात नमूद केले आहे. यामध्ये सहा तास हे शैक्षणिक अभ्यासासाठी व उर्वरित दोन तास इतर प्रकारच्या अभ्यास, खेळासाठी वापराव्यात, असे सुचविले आहे. याचबरोबर, वाचन, लेखन, व्यवहार्य गणित कसे शिकता येईल याबाबत मांडणी केली आहे. उस्मानाबाद व आंबेजोगाईमध्ये विद्यार्थ्यांना व्यवहार्य गणित कळावे यासाठी बाजारात नेले जाते या प्रकारचे प्रयोग ही सांगितले आहेत. परीक्षापद्धतीत बदल करून त्यात आॅनलाइन परीक्षा, मागणीनुसार परीक्षा तसेच ओपन बुक परीक्षा घेण्यात याव्यात. व्यवस्थापनात टॅबलेटमध्ये विविध सॉफ्टवेअर घेऊन वापर करण्यावर जोर द्यायला हवा. या अहवालावर शिफारसी, सूचना असल्यास २ूँङ्मङ्म’ील्लल्लीस्र@ॅें्र’.ूङ्मे या ई- मेल आयडीवर पाठवाव्यात. याची अंतिम मुदत २३ नोव्हेंबर आहे.