शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

सायन-पनवेल टोल ५०० कोटी रुपयांनी वाढविला : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:03 IST

सायन-पनवेल महामार्गावरील टोलच्या कामाचा ठेका देताना जाणीवपूर्वक चांगले काम करणाºया कंपन्या स्पर्धेत येऊ नयेत, असे नियम केले गेले.

मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील टोलच्या कामाचा ठेका देताना जाणीवपूर्वक चांगले काम करणाºया कंपन्या स्पर्धेत येऊ नयेत, असे नियम केले गेले. शिवाय, हे काम १२०० कोटींचे असताना, ते १७०० कोटींचे दाखविले गेले. ते दाखवून बँकांकडून १,३०५ कोटींचे कर्ज घेतले गेले. स्वत:च्या खिशातून एक रुपया न घालता, बँकेतून पैसे ‘अ‍ॅडजेस्ट’ केले गेले, अशी खळबळजनक माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या कामात दोषी असणारे कोणत्याही पक्षातले असले, तरी त्यांना सोडले जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.सायन-पनवेल महामार्गावरील टोलसंदर्भात आ. अशोक पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणात राजकीय दबाव येतील, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा, असे अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकरणात जाणीवपूर्वक कंत्राटदाराला फायदा देण्यासाठी नियम बदलले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चौकशीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी त्यांच्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून, गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केले असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे अधिकाºयांवरही कारवाई केली आहे. संबंधित आयव्हीआरसीएल आणि केवायपीएल या दोन कंपन्या, त्यांचे संचालक आणि संबंधित अभियंते दोषी असून, एसईबी या प्रकरणाची चौकशी करीत आहे. चौकशीअंती दोषींना अटक करण्यात येईल.संबंधित रस्ता खराब झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्त करावा व त्याचा खर्च ठेकदाराकडून वसूल करण्याचेही आदेश त्यांनी आज दिले. छोटी वाहने बंद केल्यावर जो कॅश फ्लो देण्यात येतो, तोच निधी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी वापरावा, असेही निर्देश देण्यात येतील.