शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सोप्या भाषेतील इतिहासासाठी दुप्पट अभ्यास लागतो

By admin | Updated: August 20, 2015 09:21 IST

इतिहास सोपा करून सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दुप्पट अभ्यास करावा लागतो. तो करतानाच शिवरायांचा इतिहास तळागाळातील माणसापर्यंत; आईबहिणींच्या थेट गर्भापर्यंत

मुंबई : इतिहास सोपा करून सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दुप्पट अभ्यास करावा लागतो. तो करतानाच शिवरायांचा इतिहास तळागाळातील माणसापर्यंत; आईबहिणींच्या थेट गर्भापर्यंत पोहोविण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग आपण केला, असे भावोद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी काढले.राज्य शासनाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर उत्तरादाखल दिलेल्या भाषणात ते म्हणाले की, गीतेतील तत्त्वज्ञान संत ज्ञानेश्वरांनी सोप्या भाषेत सांगितले, तसेच ते गीताईद्वारे विनोबांनी सांगितले. मी इतका महान नाही, पण शिवकालिन इतिहास कपाटामध्ये, संशोधक-अभ्यासकांपर्यंत मर्यादित न राहता तळागाळातील माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केले. आमच्या मायबहिणींच्या गर्भापर्यंत शिवरायांचा इतिहास पोहोचावा, याचा प्रयत्न आपण केला. ते सगळे जण आणि गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्य करणारे सर्वच ‘महाराष्ट्र भूषण’ आहेत, असे ते म्हणाले.पुरंदरे हे केवळ ‘शिवशाहीर’ आहेत या आक्षेपावर थेट उत्तर देण्याऐवजी पुरंदरे यांनी आजवर केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडून ते म्हणाले की, पुस्तकात लिहिलेले, कागदपत्रात लपलेले किंवा भाषणातून सांगितलेले जे असेल तेच जर आपण कलेच्या माध्यमातून ललित पद्धतीने, पण अस्सल पुराव्यांसह मांडले तर तो इतिहास आपल्या मनाच्या गाभाऱ्यात अभंग राहतो, हा आपला अनुभव असल्याचे पुरंदरे म्हणाले. जगाच्या पाठीवर ऐन शिवकाळाशी संबंधित अनेक हस्तलिखितं, पत्र आणि इतरही कागदपत्रं अस्ताव्यस्त विखुरलेली आहेत. त्याबाबत आम्ही ऐकून आहोत. काही ठिकाणी ते धूळखात पडले आहे. काही जणांनी आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी आणि पालख्यांच्या सजावटीसाठी हे कागद वापरल्याचे आपल्या पाहण्यात आहे, अशी खंत बाबासाहेबांनी व्यक्त केली. आपण ती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत पण शासनानेही त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मराठवाड्यातील लोकांचेअश्रू पुसण्याचा निर्धारमराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी आपण, आपले कुटुंबीय आणि सहकारी लवकरच आमच्या कुवतीनुसार काही करणार आहोत. तिथल्या बांधवांचे डोळे पुसणार आहोत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.